Marathi e-Batmya

जयंत पाटील म्हणाले, भाजपाला जशी मते कमी पडतात तशी आम्हालाही…

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अपक्षांची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही सहावा उमेदवार दिल्याचे स्पष्ट केले.

वाचा

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अपक्ष आमदारांच्या बेरजेमुळेच आमचा मतांचा कोटा पूर्ण होत असल्याने आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही. त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

वाचा

वाचा

Exit mobile version