Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला, २०२४-१९ आणि २४ ला भाजपाच मोठा…पण…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीच्या आसपास केव्हाही जाहिर होणार असल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा, मनसेकडून सातत्याने पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठका घेण्याचा सपाटा सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला सत्ताधारी पक्षांकडूनही बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना उबाठा हे दोनच पक्षांची मुंबईत ताकद आहे. दुसऱ्या पक्षाची ताकद नाही असा दावा केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत विचारले असता म्हणाले की, कोणाला आपलाच पक्ष मोठा असे वाटत असेल तर मला काही हरकत नाही असे सांगत २०१४-१९ आणि २४ ला भाजपाच सर्वात मोठा पक्ष होता आणि आहे असे सांगत राज ठाकरे यांना टोला लगावला.

राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना मुंबई मनसे आणि शिवसेना उबाठा या दोन पक्षां व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाची जास्त ताकद नसल्याचा दावा केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या दाव्यावर अप्रत्यक्ष टीका करत टोला लगावला.

आज बीडीडी चाळीतील घरांच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जर कोणाला आपलाच पक्ष मोठा आहे असे वाटत असेल त्यामध्ये मला हरकत घेण्याचं कारणं नाही असे सांगत राज ठाकरे यांना टोला लगावला.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१४ साली विधानसभा निवडणूकीत भाजपा पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता. २०१९च्या निवडणूकीत मुंबई सर्वात मोठा पक्ष होता असे सांगत २०२४ च्या विधानसभा निवडणूकीतही भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, पण कोणाला आपलाच पक्ष वाटत असेल तर त्यामध्ये काहीह हरकत घेण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा म्हणण्याचा अधिकार असल्याचंही यावेळी सांगत राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

Exit mobile version