Marathi e-Batmya

काँग्रेसची ४थी यादी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणाः काँग्रेस-शिवसेना उबाठा समोरासमोर

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल जाहिर केलेल्या यादीनंतर आज संध्याकाळी पर्यंत चवथी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. त्यानुसार १४ उमेदवारांची यादी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान काँग्रेसने जारी केली.

काँग्रेसने यावेळी अंमळनेरमधून डॉ अनिल नाथू शिंदे यांना उमेदवारी जाहिर केली असून उम्रेड अनुसूचित जाती मतदारसंघातून संजय नारायण मेश्राम यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर अमोरी- अज-मधून रामदास मेश्राम, चंद्रपूर अ.जा. मधून प्रविण रामजी पडवेकर यांना, बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात संतोष सिंग चंदनसिंग रावल यांना उमेदवारी, वरोरा विधानसभा मतदार संघातून प्रविण सुरेश काकडे यांना या जागेवरून काँग्रेसच्या धानोरकर या विजयी झाल्या. त्यामुळे या मतदारसंघातून प्रविण काकडे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

नांदेड पूर्व मधून अब्दुल सत्तार अब्दूल गफार यांना, औरंगाबाद पूर्वमधून लहु एच शेवाळे यांना, नालासोपारामधून संदीप पांडे यांना, अंधेरी पश्चिमधून माजी आमदार अशोक जगताप यांना तसेच प्रवक्ते सचिन सावंत यांनी या जागेवरून निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अशोक जगताप यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथील शिवाजीनगर येथून दत्तात्रय भैराट यांना, पुणे छावणी अ.जा. मधून रमेश बागवे यांना पुन्हा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर सोलापूरातून दक्षिण मधून बंडखोरीच्या तयारीत असलेले दिलीप ब्रम्हदेव माने यांना अखेर उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पंढरपूरातून राष्ट्रवादीचे माजी आमदार नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर दक्षिण मधून शिवसेना उबाठा गटाने अमर रतिकांत पाटील यांना उमेदवारी जाहिर केली आहे. वास्तविक पाहता हा मतदारसंघ काँग्रेसच्या हिश्शाला सुटला. तरीही शिवसेना उबाठाने या मतदारसंघातून परस्पर चर्चा न करता उमेदवार जाहिर केला. त्यामुळे येथून अमर रतिकांत पाटील यांच्या उमेदवारीच्या विरोधात काँग्रेसमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तसेच दिलीप माने यांनी शिवसेना उबाठाच्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहणार असल्याचेही कार्यकर्त्यांच्या साक्षीने जाहिर केले होते. आता शिवसेना उबाठा आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार की कोण माघार घेणार हे पहावे लागणार आहे. भूम-परांडानंतर सोलापूर दक्षिण या जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शिवसेना उबाठा गट समोरासमोर  आले आहे.

काँग्रेसची ४ थी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणेः-

 

Exit mobile version