Marathi e-Batmya

अजित पवार म्हणाले, जयंतराव ऊसाचं टनेज वाढलं की नाही… पण तुमचा… संबध नाही

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या राज्यात सुरु आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला आज अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार हे सातत्याने जयंतराव पाटील यांना उद्देशून बोलत होते. मात्र अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करत म्हणाले, जयंतराव आणि तुमचा आणि रात्रीचा संबध नाही असे म्हणताच विधानसभेच्या सभागृहात एकच हशा पिकला.

अर्थसंकल्पिय चर्चेला अर्थमंत्री अजित पवार हे उत्तर देत होते. त्यावेळी कृषी क्षेत्रात एआय-आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येऊ लागल्याने कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देईन, त्यातून शेतकरी समृद्ध होईल असेही यावेळी सांगत यापूर्वी ऊसाचं टनेज६०-७० होतं., पण जंयतराव आता १०० च्या पुढे टनेज गेलं गेलं की नाही? आज टनेज वाढल्यानंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. १४५ पर्यंत टनेज वाढले आहे. पण सांगताना १०० पर्यंतचं टनेज वाढल्याचं सांगितलं. कारण परत तुम्ही म्णाल की, हा दिवसा बोलतोय की रात्री म्हणून म्हटंल की टनेज १०० च्या पुढं गेलं असेही सांगितले. तेवढ्यात शेजारी बसलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमचा रात्रीशी संबध नाही.

त्यावर अजित पवार म्हणाले की, हे तुम्हाला माहितीय, त्यांना माहित नाही असा मिश्किल संवाद होताच सभागृहात एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, या अर्थसंकल्पात काही योजना बंद केल्याचं प्रसार माध्यमे दाखवित आहेत, काही सन्मानिय सभागृहातील सदस्यांनी त्याचा उल्लेख केला. मला तुम्हाला सांगायचं काही योजना या त्या  कारणाणुळे योजना सुरु क़रण्यात येतात. सर्वच योजनांचे पुर्विलोकन होत असते, ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या बंद कराव्या लागत असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी कोणी तरी म्हणालं आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ, पण तुमच्याकडं टाळकीच नाहीत, कुठे १० आणि कुठे १५ आणि २० टाळकी आहेत, आणि तुम्ही म्हणताय आमच्याकडं या म्हणून असा टोला महाविकास आघाडीला लगावत, मी म्हणणार नाही उगीच काही तरी बरळतात पण मी तसे बोलणार नाही काहीही बोलतात असे सांगेन.

Exit mobile version