Marathi e-Batmya

अमित शाह यांनी जाहीर केली राम मंदीराची तारीख

देशातील जवळपास सर्वच लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाने सातत्याने राम मंदीर उभारणीचा मुद्दा निर्माण करत लढविल्या. त्यानंतर मधल्या काळात कधी राम मंदीर उभारणीचा मुद्दा मागे ठेवला. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मस्जिद प्रकरणी अंतिम निकाल दिल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदीर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र मंदीराचे उद्घाटन कधी करणार असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून विचारण्यात येत होता. यापार्श्वभूमीवर अखेर केद्रींय गृहमंत्री अमित शाह यांनी राम मंदीराच्या उद्घाटनाची तारीख आज जाहीर केली.

त्रिपुरा येथे भाजपाची जन विश्वास यात्रा सुरु आहे. या सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल.त्रिपुरामधील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अमित शाह म्हणाले की, २०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, “मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे”. तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.

Exit mobile version