Marathi e-Batmya

जयंत पाटील यांचे मागणी, शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा, मदत देताना अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्या

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मदत देताना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले की, उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आणि योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी. मदत देताना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात शासनाने संवेदनशीलता दाखवत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणीही ट्विटरद्वारे केली.

Exit mobile version