Marathi e-Batmya

रोहिणी खडसे यांचा सवाल, अदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबांधे आहेत का ?

महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. खासगी सचिवाकडून महिला अधिकाऱ्यांना अश्लील भाषेचा वापर केला गेला आहे, धमक्या दिल्या आहेत तसेच बदल्यांचे रॅकेटही चालवत असल्याचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या गोष्टीचा निषेध केला आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रारही केली आहे. राजेश गायकवाड हा महिला अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत बोलतो, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या देतो. इतकेच नाही तर मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेटही हा गायकवाड चालवतोय

महिला व बालविकास सारख्या संवेदनशील विभागात असा प्रकार घडत असेल तर हा प्रकार धक्कादायक तसेच निंदनीय आहे. गायकवाड हा २०१९ सालापासून खासगी सचिव म्हणून या विभागात कार्यरत आहे, अनेक महिलांनी अनेकदा त्याच्या तक्रारी केल्या आहेत. पण मंत्री आदिती तटकरे यांनी अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रश्न आहे का ? अदिती तटकरे यांचा या गायकवाड वरदहस्त आहे का ? अदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबांधे आहेत का ? याचे उत्तर मिळाले पाहिजे ! असं त्या म्हणाल्या.

Exit mobile version