Tag Archives: minister

आशिष शेलार यांचे आश्वासन, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आदिवासी बांधवांसाठी शासन सदैव तत्पर राज्यातील ३०५ तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती

आईच्या निधनानंतर गेल्या १० ते १२ वर्षांत दिवाळीचा सण मनापासून गोड वाटला नव्हता. मात्र, कर्नाळा येथील कलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ घेताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेक वर्षांनंतर दिवाळीचा खरा आनंद अनुभवता आला, अशी भावुक व आपुलकीची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली. रायगड …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, हसन मुश्रीफांविरोधात २७०० पानांची तक्रार ईडी आणि आयकर विभागाकडे देणारे भाजपाचे किरीट सोमय्या आता गप्प का? मंत्री हसन मुश्रीफांची ‘फाईल बंद’ हीच मोदी सरकारच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाची खरी ओळख

मोदी सरकार तपास यत्रणांचा राजकीय वापर करते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील पीएमएलएअंतर्गत सुरू असलेली कारवाई बंद करण्याची मागणी स्वतः ईडीने न्यायालयात करून हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. विरोध पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करायचे व …

Read More »

मंत्री अतुल सावे यांची माहिती, दिव्यांगांच्या १६ योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी ई-वाहन, डिजिटल साधने, बालसंगोपन, कौशल्य प्रशिक्षणासह सुगम्य सुविधांसाठी अर्थसहाय्य

राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी कमाल १ टक्का निधी राखीव ठेवून त्यातून १६ प्रकारच्या योजना राबविण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागांतील पात्र दिव्यांगांना ई-वाहन, ई-बाईक, ई-व्हीलचेअर, डिजिटल साधने, बालसंगोपन निधी, कौशल्य प्रशिक्षण आणि सुगम्य सुविधांसाठी अर्थसहाय्य मिळणार …

Read More »

मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रुपयांची मदत दुष्काळजन्य परिस्थितीमुळे भव्य विवाह सोहळा साधेपणाने

महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात शेतकरी आणि ग्रामीण नागरिक भीषण पाणीटंचाई व पिकांच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. या संकटसमयी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मंत्री अतुल सावे यांनी आपल्या चिरंजीवाचा भव्य विवाहसोहळा रद्द करून अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर या सोहळ्यासाठी होणारा खर्च वाचवून मुख्यमंत्री …

Read More »

संजय राठोड यांची माहिती, दुष्काळी भागांतील मृद व जलसंधारण कामांसाठी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना कामांचे संनियंत्रण, जलद निर्णय आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीचा आढावा

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेचे संनियत्रण आणि पाणी फाउंडेशन, चंद्रा फाउंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मृद व जलसंधारण कामांचे संनियत्रण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री संजय राठोड म्हणाले की, या कामांबाबत …

Read More »

मकरंद जाधव पाटील यांची माहिती, अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत शेतीपिके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी वितरणास शासनाची मंजुरी, जून ते ऑगस्ट २०२६ मधील बाधित शेतकऱ्यांना दिलासा

यंदाच्या वर्षी जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. यापैकी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, जैन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध पहिल्या टप्प्यात ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्जवाटप

जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनामार्फत व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या देवाणघेवाणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन …

Read More »

भाजपाचे मंत्री नितेश राणे म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीसाठीही एक ‘डेडलाईन’ निश्चित ३१९ वर्षांनंतर इतिहास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुघल सम्राट औरंगजेब याला महाराष्ट्रातील खुलताबाद येथे एका साध्या, उघड्या कबरीत दफन केल्याच्या सुमारे ३१९ वर्षांनंतर, राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ती कबर हटवण्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, ही कबर हटवण्यासाठी एक तारीख आधीच निश्चित करण्यात आली आहे, मात्र ती आताच जाहीर केली …

Read More »

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कोकणातील पाणी आणणार मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे

मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही  पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी  कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त …

Read More »

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच …

Read More »