Marathi e-Batmya

शरद पवार यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार ?

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार होता त्या अनुषशंगाने जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे दावे करण्यात आले. मात्र अशी काही चर्चाच झाली नसल्याचा दावा भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यातच राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरूनही शरद पवार यांनी कानावर हात ठेवल्याने राष्ट्रवादीत नेमके काय सुरु आहे याची उत्सुकता निर्माण झाली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, शपथविधीवर मला भाष्य करायचे नाहीये, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, आनंद झाला असे सांगत त्या विषयावर अधिक बोलणे टाळले.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे हे मला कळलं नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार यावर चर्चा करत होते. यापेक्षा अधिक काहीच नाही. आता परस्परांना धीर देण्याची वेळ आहे. राजकिय मुद्यांवर आम्ही कुणाशीही चर्चा करत नसल्याचे सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चर्चा कुठल्याही अंतिम टप्प्यावर गेली असती तर आम्हाला सांगितले असती. जर कुठली तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितली असती. ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्यामध्ये गोष्टी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का असा सवाल करत त्यामुळे शरद पवार यांच्याशी त्यांचे काय बोलणं झाल, याची कल्पना नाही. आमच्या पुरतं मी एक सांगतो अशआ प्रकारच्या तारखेची माहिती असे सांगितले.

दरम्यान, शरद पवार पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये अजित पवार यांचे स्मारक बांधलं जात असून शरद पवार यांनी त्याची पाहणी केली असल्याचं बोलंल जात आहे. यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांनी माहीती फेटाळून लावत म्हणाले की, अजित पवार यांचे स्मारक बारामतीत होतेय ही गोष्ट मला माहित नाही. ज्या संस्थेच्या जागेच्या संदर्भात काही लोकांनी चर्चा केली. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे किमान मला तरी त्याबाबतची माहिती हवी. पण त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबाबत काय करायचे या सगळ लोक एकत्र बसून निर्णय घेऊ, पण तसं काहीही नसताना त्यावर भाष्य करणं योग्य नाही असे ही यावेळी सांगितले.

Exit mobile version