Marathi e-Batmya

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, एवढे पैसे वाटले पण परिणाम होणार नाही…

निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे, त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शरद पवार बोलताना म्हणाले की,एकंदर चित्र गेल्या निवडणुकीप्रमाणे न बोलणारं आणि मतदानाच्या दिवशी रिअॅक्ट होणारं आहे. आताची स्थिती वेगळी आहे. सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना लोकसभा निवडणुकीचा जो फटका बसला, त्याची त्यांनी सीरिअस नोंदघेतली. लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना जास्तीत जास्त पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. पण त्यांनी दिली नाही. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. उदा. लाडकी बहीण. दोन कोटी महिलांना १५०० रुपये दिले. त्यांना महिलांना खूश केलं. पण त्याचा परिणाम काही ना काही होईल. एवढे पैसे वाटले. पण फार परिणाम होणार नाही, असे भाकीतही यावेळी केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, एकीकडे त्यांनी मदत केली. पण महिलांवर अत्याचार वाढले आहे. दोन वर्षात ६७ हजार अत्याचार महिलांवर झाले. ही लहान गोष्ट झाली नाही. मुली किंवा स्त्रिया बेपत्ता होण्याची माहिती आहे. ६४ हजार महिला आणि मुली राज्यात बेपत्ता आहे. त्यात गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे, त्या नागपुरातील ही नोंद होत आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. महिला गायब होत आहेत. त्याचा काही परिणाम होईल ना, असेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दुसरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पीक हातातून जात आहे. काही भागात सोयाबीन आणि कापूस महत्त्वाचा आहे. त्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. त्यांच्या आत्महत्या होत आहेत. तिसरा प्रश्न आहे, तो म्हणजे शैक्षणिक संस्था वाढल्या. लोक शिकत आहे. संधी मिळत आहे. पण काम कुठे आहे. नोकरी नाही, रोजगार नाही, तरुणांसमोर प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे. दुसऱ्या बाजूला सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

Exit mobile version