यंदा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीचा सण एकत्रित आला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी मनसेकडून दिपोस्तव कार्यक्रमाचे आयोजन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे भाजपाने सहानभूती दाखविलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नियमबाह्यपणे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करीत शिवसेना उबाठाने मनसेच्या दिपोत्सत्व कार्यक्रमाच्या विरोधआत निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिताभंगाची तक्रार केली. सदर कार्यक्रमाचा खर्च अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा अशी मागणी शिवसेना उबाठाचे उपसचिव सचिन परननाईक यांनी एका पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या ठिकाणी विद्यमान आमदार सदा सरवणकर याना उमेदवारी दिली. या मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या पाठीमागे महायुतीचे पाठबाळ उभे करण्याचा भाजपाचा मनोदय आहे त्यासाठी अंतर्गत बैठकादेखील चालू आहेत. मात्र आमदार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास स्पष्ट नकार देत राज ठाकरे यांनीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीच तयार झालेल्या माझ्यासारख्या शिवसैनिकाच्या मागे उभे रहावे असे आवाहन केले.
माहिम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर असा सामना रंगला असतानाच मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित परंपरागत दीपावली महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल अमित ठाकरे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत तसेच ह्या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहिम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा उपसचिव सचिन परसनाईक यांनी भेट देत निवेदन दिले.
शिवसेना उबाठाने अमित ठाकरे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची प्रत खालीलप्रमाणे…
