Marathi e-Batmya

सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आपल्या नियोजित अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेमोरियल मधील देवतांचे पूजन केले. त्यानंतर आता ४५ तासांचे ध्यान सत्र सुरू करतील, असे सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी आधीच जाहिर केले होते की, ३० मेच्या संध्याकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत सुमारे ४५ तास ध्यान मंडपम येथे ध्यान करतील, जेथे आध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद यांनी १३१ वर्षांपूर्वी ध्यान केले होते. गुरुवारी संध्याकाळी कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान थेट भगवती अम्मान मंदिराकडे रवाना झाले.

पंतप्रधान मोदी हे निवडणूक प्रचाराच्या शेवटी अध्यात्मिक यात्रा करण्यासाठी ओळखले जातात. २०१९ मध्ये त्यांनी केदारनाथला भेट दिली आणि २०१४ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतापगडला भेट दिली.

लोकसभा निवडणूक १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत होत असून, ४ जून रोजी निकाल जाहिर होणार आहेत. तर पंतप्रधान मोदी आणि भाजपा २०१९ मध्ये त्यांच्या गणनेपेक्षा जास्त कामगिरी करून सत्तेत परत येण्याची आशा आहे.

मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि त्यांच्या मुक्कामादरम्यान २,००० पोलीस कर्मचारी पहारा देतील, भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल देखील कडेकोट बंदोबस्त ठेवतील.

https://x.com/BJP4India/status/1796158157246349758

Exit mobile version