लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी (१६ डिसेंबर, २०२४) राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी (१७ डिसेंबर २०२४) विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाली असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून विरोधक इंडिया आघाडीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत लोकसभेत एकच गोंधळ केला. त्यामुळे लोकसभेचे आणि राज्यसभेतही यासंदर्भात गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे संसदेचे कामकाज दुपार पर्यंत तहकूब करण्यात आले.
अमित शाह यांनी “आंबेडकर, आंबेडकर” असे म्हणत राहण्याची आता “फॅशन” झाली असल्याचे वक्तव्य करत, परंतु विरोधकांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर ते स्वर्गात पोहोचले असते असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यमुळे हा घटनेच्या शिल्पकाराचा अपमान असल्याचे सांगत विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘जय भीम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आंबेडकरांचे फोटो घेऊन त्यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावरून भाजपावर निशाणा साधला.
Open Letter to Union Home Minister Amit Shah
Shri Amit Shah avare,
First, let me congratulate you for finally speaking the truth by openly revealing the BJP's real opinion about Dr. Babasaheb Ambedkar. Your statement in Parliament (18-12-2024) didn’t surprise us; we already… pic.twitter.com/zjxDHEugwb
— Siddaramaiah (@siddaramaiah) December 18, 2024
तसेच डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केल्याने राज्यसभेचं कामकाजही तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी अमित शाह काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना ज्याप्रकारे वाईट वागणूक दिली, त्याबद्दल ते बोलत होते, असे सांगितले तरी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी “जय भीम” च्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.
लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची मागणी करणारी वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील दोन सुधारणा विधेयके मंगळवारी लोकसभेत आक्रमक चर्चेनंतर कायदामंत्र्यांनी मांडली. दरम्यान विरोधी सदस्यांनी हे विधेयक देशाच्या राज्यघटनेच्या “संघविरोधी” असल्याचे प्रतिपादन केले आणि ते मूलभूत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. या विधेयकाच्या बाजूने २६९ सदस्यांनी मतदान केले तर १९८ विरोधी सदस्यांनी विरोधात मतदान केले. यानिमित्ताने नवीन संसद भवनात लोकसभेत पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करण्यात आला. राज्यसभेत मंगळवारी संविधानावरील दोन दिवसीय चर्चेचा समारोप झाला.
INDIA bloc MPs protest against Union Home Minister Amit Shah's speech in the Rajya Sabha during the Constitution debate yesterday, because he insulted Dr. BR Ambedkar, the architect of our Constitution.
The Home Minister must apologise for his unacceptable remarks, which have… pic.twitter.com/6hPB1O9NCc
— Congress (@INCIndia) December 18, 2024
