गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आणलेल्या या बॅगेवर एकाबाजूला मोदी यांचे व्यंगचित्र तर दुसऱ्याबाजूला गौतम अदानी यांचे व्यगचिंत्र यावेळी दाखविण्यात आले होते. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आणलेली बॅग यावेळी इंडिया आघाडीतील सदस्यांनी ही हातात घेऊन दाखवली. यावेळी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या सदस्यांनी संसदेच्या आवारात घोषणाबाजीही केली. यावेळी विरोधी पक्षाच्या सर्वांनी सदनात पंतप्रधान मोदी यांनी सदनात याप्रकरणी उत्तर द्यावे अशी मागणीही यावेळी केली.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या या आंदोलनात मात्र समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी भाग घेतला नाही. त्यामुळे भाजपाने इंडिया आघाडी विखुरल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांना जेव्हा कळलं की मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग प्रियांका गांधी यांनी आणली आहे. तेव्हा राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांनी आणलेल्या बॅगेच कौतुक केलं. तसेच बॅग खरंच खुप ख्युट असल्याचे सांगत त्याचे स्वागतही केले. तसेच ही बॅग कोणी बनवली असल्याचं असे विचारताच प्रियांका गांधी खळाळून हसल्या.
यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, संसदेचं अधिवेशन सुरु होऊन १० दिवस झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत आलेले नाहीत. ते कुणापासून तोंड लपवून फिरत आहेत, असा सवाल करत अदानीबाबत चर्चेसाठी पंतप्रधान मोदी हे घाबरत आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी का आले नाहीत असा पुन्हा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी तर नवीन खासदार आहे, पण पंतप्रधान इथे का आले नाहीत, तसंच अदानीचा मुद्दा इथे उपस्थित करायचा नाही का असा सवाल करत उत्तर प्रदेशमधील कुठल्याही गावात जा शेतकऱ्यांच्या घरी भरमसाठ वीज बिल येत आहे. अमेरिकेत अदानीच्या विरोधात काय आरोप केले जात आहेत, अदानीच्या विरोधात चार्जशीट का दाखल झाली तर अदानी समुहाने हजारो कोटी रूपयांची लाच दिली. त्यामुळे जनतेच्या वीज बिलात वाढ करता येईल हा मुद्दा थेट जनतेशी संबधित आहे. त्यावर आम्ही बोलायचं नाही का असा थेट सवालही यावेळी केला.
INDIA गठबंधन की पार्टियां अडानी महाघोटाले पर चर्चा चाहती हैं, लेकिन मोदी सरकार लगातार इससे भाग रही है।
आज INDIA गठबंधन के नेताओं ने मोदी सरकार की इस तानाशाही के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/Vv5xjc0yM7
— Congress (@INCIndia) December 10, 2024
