मंगळवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच निघाली असल्याचे सांगत करत इतक्यावेळा जर देवाचे नाव घेतले असते तर कदाचित स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. या भारतीय राज्यघटनेला स्विकृतीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात खास चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या चर्चेच्या वेळीच अमित शाह यांचे वक्तव्य आल्याने देशाच्या सर्वस्तरातूनच अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उडवून देण्यात आली. तसेच या घटनेचे पडसादही महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटले. अखेर या प्रश्नी आपली भूमिका भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजित केली.
यावेळी बोलताना अमित शाह यांनी या सर्व प्रकरणाचे खापर काँग्रेसवर फोडत, मागील दोन दिवसांपासून काँग्रेसने जाणीवपूर्वक माझे वक्तव्य तोडून-मोडून प्रसारित केले. त्यामुळे एकप्रकारे गैरसमज झाला. परंतु मी अशा पक्षाच्या संस्कृती आणि राजकिय पार्श्वभूमीवरून आलो आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कधी करण्याचा विचारही केला नाही. यापूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजपाने नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान केला आहे. तसेच त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चर्चा करण्यात आली. या चर्चेत देशाच्या गौरव यात्रा आणि विकास यात्रेवर चर्चा करण्यात आली. जेव्हा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात असतात त्यावेळी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळे असतात. असेही यावेळी सांगितले.
तसेच अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, संसदेत ज्यावेळी काही मांडाल तेव्हा त्यास आधार, तथ्य असायला हवं. काँग्रेसने सोमवारपासूनच वास्तवाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. ही बाब निषेधार्ह आहे. मी याचा निषेध करतो. भाजपाच्या वक्त्यांनी राज्यघटनेच्या मुल्यावर भाष्य केले. राज्यघटनेच्या संवर्धनावर वक्त्यांनी भाष्य केले. काँग्रेस हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करणारा पक्ष आहे. राज्यघटना विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा विरोध केला. स्वातंत्र्यवीर सावकर यांचा विरोधी आहे. त्यांचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटनेची लक्तरं केली. स्त्रियांच्या सन्मानाचा विषय बाजूला फेकला. न्याय व्यवस्थेचा अपमान केला. शहिदांचा अपमान केला, देशाची भूमी तोडण्याचे काम काँग्रेसने केले. हे सगळं सत्य देशासमोर आलं तेव्हापासून पुन्हा एकदा काँग्रेस तोडफोड करून सत्याला असत्याचे कपडे घालण्याचा कुत्सित करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच निधन झाल्यानंतरही काँग्रेसने हेच केले. १९५१ ते ५२ आणि १९५४ मध्ये काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्याचा प्रयत्न केला. मैत्रीपूर्ण लढतही घेतली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कसा होईल यासाठीच प्रयत्न केले. भारतरत्न पुरस्काराबाबत बोलायचं झालं तर १९५५ मध्ये पंडित नेहरूनी स्वतःला हा पुरस्कार दिला. १९७१ मध्ये भारतरत्न पुरस्कार इंदिरा गांधी यांनी स्वतःला भारतरत्न हा पुरस्कार दिला. त्यानंतर १९९० साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला. त्यावेळचे सरकार हे भाजपाच्या पाठिंब्यावर (व्हि.पी.सिंग याचं सरकार) होतं असे सांगायलाही अमित शाह विसरले नाही.
अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, १९९० सालापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळू दिला नाही. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १०० वी जयंतीही साजरी केली नाही. पंडित नेहरू यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असणारा तिरस्कार जगजाहिर आहे. पंडित नेहरूंच पुस्तक सिलेक्टेड वर्ड ऑफ जवाहर या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ५३२ वर एक उल्लेख आहे, त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळातून जाऊ इच्छितात असे एक पत्र आहे. त्या पत्रावर पंडित नेहरू यांनी उत्तर दिले की, डॉ आंबेडकर हे मंत्रिमंडळातून गेल्याने काहीही फरक पडणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाच मुल्याकंन नेहरू कसे करत होते हे सांगणार हे उदाहरण असल्याचेही यावेळी सांगितले.
Addressing a press conference in New Delhi. Watch Live… https://t.co/xeoNlGQGu3
— Amit Shah (@AmitShah) December 18, 2024
