काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या विभागवार बैठका उद्यापासून घेण्यात येणार आहेत. कोकण विभागाची बैठक बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबरला काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे तर उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक गुरूवारी ५ नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.
या पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या कामाच्या अपेक्षा (SOP) प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. सर्व प्रभारींच्या कामाचा आढावा तीन महिन्यात घेण्यात येईल व त्यांनी केलेल्या कामाची समिक्षा करून प्रभारींच्या यादीमध्ये त्यानुसार फेरबदल करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन राज्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियोजनबद्ध कामाची आखणी केली असून काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस आणण्याचा संकल्प केलेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिली आहे.
