राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरिष महाजन यांच्याबाबत राज्य मंत्रिमंडळात आणि दस्तुरखुद्द भाजपामधील कार्यकर्त्यांच्यामध्येच विविध चर्चा सुरु असतात. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरिष महाजन यांच्यावर एक नवा आरोप केला असून एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत त्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहिर केले. तसेच तो विडिओही यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा विषयाखाली एका पत्रकाराने क्लिप प्रकाशित केली. त्यात संबधित पत्रकाराने सांगितले की, गिरिष महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबध आहेत. त्यांचे नाव मला ही माहित आहे. पण ते सांगण उचित होणार नाही.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी अमित शाह यांनी महिला आयएएस अधिकाऱ्याबाबत विचारणा केली होती. तेव्हा गिरीश महाजन यांनी कामाच्या निमित्ताने माझे अनेकांबरोबर संबध आहेत. त्यावेळी अमित शाह यांनी सांगितले होते की, तुमचे ( गिरीश महाजन यांचे) कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. १०० वेळा त्या महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर तुझे कॉल झालेले आहेत. पुढे काहीही सांग तुझा सीडीआर खरं बोलतो. अमित शाह यांच्या या वक्तव्याचा हवाला देत संबधित पत्रकाराने काही प्रश्न उपस्थित केले असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
एकनाथ ख़डसे पुढे बोलताना म्हणाले की, मला वाटतं अमित शाहंकडे असलेले सीडीआय तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजानांच्या रंगल्या रात्री असं पत्रकाराने म्हटलं आहे. अमित शाह यांची भेट झाली तर यातील तथ्य किती आहे हे विचारणार असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांचे हे संबध अवघ्या राज्याला माहित आहेत. हे आजचं नाही. कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही चर्चा सुरु आहे. या महिला अधिकाऱ्याचेही नावही सर्वश्रूत आहे. आयएएस अधिकाऱ्यांना मंत्री फोन करत असतील आणि त्यात जर तथ्य असेल तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार काय, नैतिकता आहे की नाही बायकांना रात्री फोन करणे योग्य आहे का असा सवाल करत हे प्रकरण सर्वांना माहित असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी खडसे यांना आव्हान देत यातील एक जरी पुरावा खडसे यांनी दाखवला तर मी राजकारण सोडेन आणि घरी बसेन असे जाहिर केले. उगाच काहीही आरोप करत आहेत असेही यावेळी सांगितले.
