Marathi e-Batmya

पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेस टुकडे टुकडे गँग आणि शहरी नक्षली…

विश्वकर्मा जयंती आणि केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त वर्धा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही करत पीएम मित्र प्रकल्पाचे आणि पुण्याश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभही यावेळी केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदींनी वर्धा येथील विश्वकर्मा कार्यक्रमातील प्रदर्शनाला भेट दिली. विश्वकर्मा योजनेच्या एक वर्षाच्या निमित्ताने ते वर्धा येथे आहेत आणि त्यांनी १८ ट्रेड अंतर्गत १८ विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना क्रेडिट दिले आणि प्रमाणपत्रे जारी केली.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच आमच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अपमान केला आहे असा आरोप करत कर्नाटकात गणपत्ती बापाला तुरुंगात डांबल होतं. तसेच काँग्रेसकडून नेहमीच शहरी नक्षलवादाचे समर्थन करत आला आहे. काँग्रेस हा भ्रष्टाचाऱ्यांचा आणि बेईमान लोकांचा पक्ष असल्याची टीका करत काँग्रेसचे काही लोक परदेशात जाऊन देशाच्या विरोधात भाषणं करतात अशी राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ही काँग्रेस तुडके तुडके गँग आणि शहरी नक्षलवादी चालवत आहेत अशी टीका करत काँग्रेस हा देशातील सर्वात अप्रमाणिक व भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट म्हणून ओळखला जातो. काँग्रेसने आजपर्यंत कधीच आपल्या संस्कृती आणि आस्थेचा कधीच सन्मान केला नाही. त्यांनी जर आपल्या संस्कृती आणि आस्थेचा सन्मान केला असता तर गणेशोत्सवाचा, गणपतीचा कधीच विरोध केला नसता अशी टीकाही यावेळी केली.

गणेशोत्सवावरून टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरु केली. प्रत्येक समाजाला, वर्गाला एकत्र आणलं. मात्र काँग्रेसने गणेशोत्सवाचा तिरस्कार केला. अलिकडे एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. मात्र काँग्रेसचा जळफळाट झाला. त्यांच तुष्टीकरणाचं भूत जागं झालं. गणेश पूजनालाच विरोध केला. एका वर्गाचं समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जो पक्ष आपल्या संस्कृतीचा आदर करतो तो गणपती पूजेचा अनादर करणार नाही… काँग्रेस पक्षाला गणपती पूजेची अडचण आहे. सरन्यायाधीशांच्या घरी मी गणपती पूजेला गेलो होतो आणि त्यांना त्यात अडचण वाटल्याची टीकाही यावेळी केली.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाचे नेते परदेशात जाऊन देशविरोधी भाषणे करतात. “तुडके तुडके गँग आणि शहरी नक्षलवादी चालवणारी काँग्रेस, आहे अशी टीकाही यावेळी केली.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स X वर म्हणाले होते की, फक्त २ दिवसांपूर्वी, आम्ही सर्वांनी विश्वकर्मा पूजा साजरी केली आणि आज वर्ध्याच्या पवित्र भूमीवर, आम्ही ‘पीएम विश्वकर्मा योजने’चे यश साजरे करत आहोत. आजचा दिवस देखील खास आहे कारण यानिमित्ताने १९३२ मध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम सुरू केली. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून श्रमातून समृद्धी आणि कौशल्याच्या माध्यमातून उत्तम उद्याचा संकल्प केला असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपले संकल्प यशस्वी करण्यासाठी बापूंची प्रेरणा हे माध्यम बनेल. या प्रसंगी मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो. आज अमरावतीमध्ये ‘पीएम मित्र पार्क’ची पायाभरणीही करण्यात आली आहे. आजचा भारत आपल्या वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत अव्वल स्थानावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचे हजारो वर्षे जुने वैभव परत मिळवणे हे देशाचे उद्दिष्ट आहे. अमरावतीचे ‘पीएम मित्र पार्क’ हे या दिशेने आणखी एक मोठे पाऊल असल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version