Marathi e-Batmya

विमान अपघात प्रकरणी राज ठाकरे म्हणाले, एफआय़आरला सरकार का घाबरतंय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषदत घेत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. तसेच मुंबई पुणे येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी एफआयआर घेण्यास असमर्थता दर्शविली.

त्यातच रोहित पवार यांनी यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातील सर्व माहिती राज ठाकरे यांना दिली. तसेच या प्रश्नी चर्चा ही केली. दरम्यान रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विचारले की,अजित पवार यांच्या अपघातामधअये काही काळंबेरं आहे का असा संशय निर्माण होतोय. कारण सरकार एफआयआर का दाखल करून घेत नाहीए असा सवालही यावेळी उपस्थित करत एफआरला सरकार का घाबरतयं असा सवालही यावेळी उपस्थित केला.

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी मला भेटून सर्व टेक्निकल गोष्टी सांगितले. मला त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली ती त्यांना तीन ठिकाणी एफआयआऱ दाखल करून घेतले नाहीत. संबधित पोलिस ठाण्याला सांगितलं गेलं की एफआयआर दाखल करून घ्यायचे नाहीत. त्यामुळे मला इथे संशयाची सुई वाटते, राज्य सरकार एफआयआर करून का घेत हा प्रश्न आहे. जेव्हा रोहित पवार मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गेले तेव्हा तेथील अधिकारी एफआयआर लिहून घेत होते. मात्र तेवढ्यात डीसीपी आले आणि सांगितले की, एफआयआर दाखल करून घ्यायचा नाही. हे काय आहे असा सवाल केला.

राजड ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचा निव्वळ अपघात असेल, पण समजा त्यांच्या घरच्यांना जर काही संशय असेल तर आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्यवस्थित व्हावी असं वाटत असेल एफआयआर दाखल करून घेण्यास सरकार अडथळे का आणतंय असा सवाल करत सुनेत्रा पवार तिकडे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत. त्यांनी देखील या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे, मात्र सरकारकडून एफआयआर दाखल करून न घेण्यासाठी का दबाव येतोय असा सवाल करत मला याचं राजकारण माहिती नाही. राज्यात सांगितलं गेलं की, कोणीही एफआयआर दाखल करू शकतो. पण एफआयआर नोंदवायला गेलेल्या व्यक्तीला व्यक्तीला तुम्ही अडथळे आणत असाल तर यामध्ये काळबेरं आहे का असा संशय निर्माण होतोय असेही शेवटी सांगितले.

शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार संशय निर्माण करत आहे. जर एफआयआर नोंदवायचा असेल आणि योग्य चौकशी व्हावी असं वाटत असेल तर त्यात गैर काय असा सवाल केला. त्यामुळे सरकारने या गोष्टींची उत्तरे दिली पाहिजेत. तसेच ब्लॅक बॉक्सच देखील अद्याप काही कळालेलं नाही. सरकार अशा प्रकारे संशयाची भूते नाचवत आहे. यामध्ये राजकारण आहे. मला माहित नाही. पण माझा एकचं प्रश्न आहे की, एफआयआर नोंदवून का घेतला जात नाही आणि तो एफआयआर नोंदवला जाऊ नये या साठी सरकार का प्रयत्न करत आहे याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत अशी मागणीही यावेळी केली.

Exit mobile version