Tag Archives: राज्य सरकार

सरकारकडून आप्तकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन नंबर जारी आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत असणारे …

Read More »

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती, टीईटीबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक शिक्षकांना एआयचे मोफत प्रशिक्षण

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही सेवामूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे. टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व  सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. तसेच राज्यातील सर्व शिक्षकांना गुगल एज्युकेशनच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल, अशी  माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज …

Read More »

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची माहिती, टीईटी परीक्षा पुढे ढकलली परिपत्रक जारी करत दिली माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे, परीक्षा प्रक्रीया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज राज्यावर पाणीटंचाईचे संकट पाणी पुरवठा योजनेची १८ हजार कोटींचा निधी केंद्राने दिलेला नाही. या वर्षात थकलेल्या बिलांपैकी किती बिले दिली?

जलसंधारणाची कामे अपुरी आहेत, भूजलात अनियंत्रित उपसा सुरू आहे, जलवाहिन्यांमधील गळती आहे, नदी-नाल्यांमध्ये अतिक्रमण झाले. त्यामुळे केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज राज्यावर पाणीटंचाईचे संकट आले आहे असे ताशेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी राज्य सरकारवर ओढले. आज विधानसभेत पाणीटंचाईवर …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट, सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रपरिषदेत विरोधी …

Read More »

महाविकास आघाडीची मागणी, सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा हे महायुती सरकार नाही तर ५६ टक्के कमिशन सरकार, विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यावर सरकारने उत्तर द्यावे, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. राज्यात दुष्काळ,शेतकरी प्रश्न, महिलांवरील वाढते …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, भाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार भाडेपट्टाधारकांची नावे 'इतर हक्कात' नोंदविणार

राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दणका दिला आहे. आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात ‘कब्जेदार’ म्हणून केवळ ‘महाराष्ट्र शासन’ हीच नोंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महसूल …

Read More »

मागासवर्गीय अधिकाऱ्यांची पदोन्नतीत अडवणूक सामान्य प्रशासन विभागाकडून पदोन्नतीच्या आदेशात अनियमितता

पदोन्नतीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने  ‘जैसे थे’  आदेश दिले असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून खुल्या प्रवर्गातील अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या मंत्रालयातील   मागासवर्गीय अधिकार- कर्मचाऱ्यांची अडवणूक केली आहे. पदोन्नतीचे आदेश जारी करण्याबाबत चालढकल होत असल्याने मागासवर्गीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. मर्यादित विभागीय …

Read More »

स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात करारनाम्याचे हस्तांतरण

मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री …

Read More »