मिसिंग लिंक तयार होऊन दोन तीन महिने झाले नाही तोच पहिल्याच पाऊसात मिसिंग लिंगमध्ये धबधब्याचे स्वरूप पाह्यला मिळाले. या स्थितीवरून मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सरकारच्या कामावर टीकाही केली. मात्र २९३ च्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांच्या टीकेला प्रतित्त्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून भाडे के तट्टू वगैरे अशी विरोधकांना उपमा देत विरोधकांवरच टीकेचा भडीमार केला. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल करत टीका केली.
मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री आहेस ना तू? वाक्य संपल्या संपल्या लगेच हिंदीतून सुरु झाले. मिसिंग लिंक के बारे में… कोणासाठी हिंदीतून बोललात असा सवाल करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिंदीत बोलतात? कोणासाठी ? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघु घेईन असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आमच्या सरकारला हिंदीची आस्था,कालचं विधानसभेतलं मुख्यमंत्र्यांचं भाषण, मिसिंग लिंकवर दरळ कोसळली, त्याचं राजकारण करू नका म्हणाले. त्यावर बोलले की राजकारण ? मग इतकी वर्षे आपण काय करत होतात? दुसऱ्याचं सरकार होतं. तेव्हा तुम्ही काय करत होतात? तेव्हा जी आंदोलन झाली ते राजकारण नव्हे? स्वतःच्या अंगावर आलं की राजकारण, असं कसं होईल ? असा प्रश्नांचा भडीमार करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मिमिक्री करत म्हणाले, एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान करू नका. लोक मिसिंग लिंकवर बोलत आहेत, महाराष्ट्राचा अपमान कुठे करत आहेत? केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर की तुम्ही देशविरोधी, केंद्राची कामे आहेत ही, त्यात देशाचा संबधत काय? मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला? लोकांनी प्रश्नही विचारू नयेत ? काय चाललंय हे? असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जे काही घमासान सुरु आहे पक्षात. ते फक्त पहात राहा. शहरांचा विचका झाला आहे. ज्याला हे विकास म्हणत आहेत. या विषयावर मी इतके वर्षे बोलतोय. आपल्याकडे टाऊन प्लिनिंग होत नाही. बघावं तिकडे इमारती उभ्या रहात आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, स्रव बांधकामे बंद करा, ब्रीज फ्लायओव्हर म्हणजे विकास नव्हे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली.
