Marathi e-Batmya

पुण्यात रेव्ह पार्टीः एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक

मागील काही वर्षात राज्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थाचा वापर राज्यातील तरूणाईंमध्ये वाढल्याच्या चर्चा वाढीस लागल्यानंतर आता हनी ट्रॅपचे प्रकारही वाढत असल्याचा मुद्दा नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून ही याच प्रकारचे आरोप भाजपाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन आणि लोढा नामक व्यक्तीवर करण्यात येत आहेत. त्यातच पुण्यात एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

रेव्ह पार्टी ज्या इमारतीत आयोजित करण्यात आली होते. ती पार्टी पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरु होती. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी पार्टीत सहभागी असलेल्यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्या सर्वांना ससून रूग्णालयात पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

दरम्यान या यासंदर्भात एकनाथ खडसे यांना विचारता ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरु होते, त्यावरून असे काही तरी घडू शकते, याचा मला अंदाज येत होता. पुण्यात जी काही घटना घडली ती मी प्रसारमाध्यमातून पाहिली आहे. माझे आणि त्यांचे (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन करणार नाही.

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, पोलिस यंत्रणेने खरोखर चांगल्या पध्दतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते आहे की, पोलिस यंत्रणा व्यवस्थित तपास करत नाही. अशी जनमानसात प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जाणूनबुझुन अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर ते ही सहन करणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

एकनाथ खडसे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यावर अशा प्रकारची काहीतरी कारवाई केली जाईल किंवा ट्रप रचला जाईल असा खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यावर भाजपाचे गिरिश महाजन यांनी खडसे यांना खोचक टोला लगावत म्हणाले की, जर ट्रप लावला जाणार याची कल्पना खडसे यांना होती. तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवे होते.

Exit mobile version