Marathi e-Batmya

संजय राऊत यांचा सवाल, संडास धुणारा बंदुकीबरोबर कधीपासून खेळायला लागला

बदलापूर प्रकरणातील आरोपी हा त्या शाळेत संडास धुवणारा होता. आणि एक संडास धुणारा व्यक्ती बंदूकीसोबत खेळू शकतो का असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबधित शाळेच्या ट्रस्टीला वाचविण्यासाठीच कालचं हे नवं कथानक रचलं गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर हजारो बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं. त्यावेळी तेथील आंदोलकांची मागणी हीच होती की, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशीची शिक्षा देतो, त्यावेळी त्या आंदोलकांनी एकाही नेत्याला की प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलू दिलं नाही. आणि आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व आंदोलनकर्त्यांना नोटीसा काढून अटक करण्यात आली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा कुणाला हातात घेऊ दिला जाणार नाही असे वक्तव्य केले होते. मग काल काय केलं असा सवालही यावेळी उपस्थित केलं.

जसंजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, काल जे कथानक रचलं गेलंय ते जर पाहिलं तर एखाद्या संडास धुणाऱ्या आरोपीची इतकी हिम्मत होऊ शकते का कि तो पोलिसांच्या कमरेला लावलेली रिव्हॉलर हिसकावून घेऊ शकतो आणि तीही लॉक असलेली त्यातून तीन राऊंड फायर करू शकतो का, त्याचे दोन्ही हात बांधलेले असताना तो असे कृत्य करू शकतो हे पटणारे नाही असा संशय व्यक्त करत शाळेचा जो ट्र्स्टी आहे, तो भाजपाशी संबधित आहे. तो अद्याप फरार आहे त्याला अटक करण्यात आलेली नाही. ह्या ट्रस्टीचे संबध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आहेत. त्याला वाचविण्यासाठीच हे कथानक रचलं गेलं असा आरोपही यावेळी केला.

यावेळी विरोधक अक्षय शिंदे याची बाजू घेत आहेत असा आरोप मुख्यमत्री शिंदे करत आहेत त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आरोपीची बाजू कोण घेतलं, कोणीही अक्षय शिंदे यांची बाजू घेत नाहीय. पण कोणाला तरी वाचविण्यासाठी जे नवं कथानक रचलं गेलयं त्यावर सगळ्याचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री शिंदे ला पैशातील खरं खोटं कळतयं पण बाकीच्या गोष्टीत त्याला खोटं नीट बोलताही येत नाही असा आरोप करत शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कोणी काढले, ते काय त्या अक्षय शिंदे याने काढले का, ते यांनीच काढले ना, मग ते जाहिर का केले नाही शाळेच्या ट्रस्टींना अद्याप अटक का नाही असा सवालही यावेळी केला.

यावेळी संजय राऊत यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

Exit mobile version