भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपच्या बड्या नेत्यांची या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी सांगत भारत-पाक सामना भरवण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध करत निषेध केल्याच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंक, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन करण्यात येणार आहे. महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार असल्याचेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही खरपुस समाचार घेतला. भारत पाक सामना होणार नाही असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. ज्यांनी मैदान उखडलं ते सुद्धा शिंदे गटात आहेत. भारत पाकिस्तान मॅचच्या दरम्यान मोठे गॅम्बलिंग राजस्थान आणि उत्तरेतल्या राज्यात होत आहे असा मोठा आरोपही केला. त्यांनी हा सामना न खेळवण्याचे आवाहन केले. तर या मुद्यावर एकनाथ शिंदे आता काय करताय असा सवालही केला.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवतिर्थवरील भेटीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, जागा वाटपाबद्दल वृत्तपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच आत मध्ये होतो तिथे दुसरं कोणीही नव्हतं तर मग आज काय झालं कोणाला माहिती आहे का? या खोट्या बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत, असेही स्पष्टीकरण यावेळी दिले.
पहलगाम हल्ल्यावरून देशात पाकिस्तानविरोधात क्षोभ असतानाच दुसरीकडे अबुधाबीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत आहे.१४ सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप २०२५ मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येतील. हा सामना रद्द करण्याची देशभरात मागणी होत आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर बोचरी टीका केली. पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, याचा भाजपाला विसर पडला का? असा सवाल भाजपला केला. त्याचवेळी येत्या रविवारी शिवसेना उबाठा सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
