Marathi e-Batmya

संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं

निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी एक वर्ष थांबू. परंतु, तुम्ही आधी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी यावेळी घोषणा केली की, निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि सरकार विरोधात आपला लढा कसा असेल याची माहिती आज दुपारी सर्वपक्षिय पत्रकार परिषदेत दिली जाईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेना उबाठाच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत १ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व विरोधी पक्षाकडून विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.

या पत्रकार परिषदेला शिवसेना उबाठाचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, मनसे नेते बाळा नांदगांवकर अभिजीत पानसे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्व पक्षिय विराट मोर्चा निघेल. जिल्ह्याजिल्ह्यातील, गावागावातील मतदानाचा अधिकार मतदानाचा अधिकार गमावलेले लोक या मोर्चाला येतील. मतदारांची ताकद या देशाच्या पंतप्रधानांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना व निवडणूक आयोगाला दाखवून देऊ. निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेच आहे. तसेच आयोगाला आणि व दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे की इतका अन्याय होत असताना महाराष्ट्र स्वस्थ बसलेला नाही. अजगरासारखा पडलेला नाही. त्यांच आव्हान स्विकारायची आमची तयारी असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत आम्ही जो मोर्चा काढणार आहोत. त्याची वेळ आणि मार्ग लवकरचं जाहिर करू मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रमुख राजकिय पक्ष पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देतील, मात्र हा मोर्चा देश बघेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे सगळ्या देशाला आम्ही दाखवून देणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version