Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाचा जाहिरनामा प्रकाशित, शिवरायांचं मंदिर ते मोफत शिक्षण….

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्यातल्या जनतेसाठी पंचसूत्री जाहिर केली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा अर्थात जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी छोटेखानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वचननामा काय आहे याची माहिती दिली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रकाशित होईलच बारीक-सारीक गोष्टी आहेत त्या आम्ही शिवसेना उबाठाच्या वचननाम्यातून ती वचनं राज्यातील जनतेसाठी देण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही महायुतीत होतो तेव्हाही वचननामा आणला होता. तसंच आता महाविकास आघाडीत असतानाही वचननामा आम्ही आणत असल्याचे सांगत मुंबई आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि गावठाण यांच्याकडे आता सरकारची वाकडी नजर पडली आहे. या कोळीवाड्यांचे क्लस्टर डेव्हल्पमेंट करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय ते सगळं एकत्रित करायचं आणि टॉवर बांधून द्याचे आणि बाकीची जमिन ही त्यांच्या मित्राला त्यांच्या घशात घालायची असा हा सगळा प्रकार त्यांनी सुरु केलेला आहे. पहिल्यांदा हा काळाकुट्ट जीआर रद्द करून कोळीवाड्यांच अस्तित्व यांची ओळखं आम्ही कदापी विसरू देणार नाही. या सर्वांना मान्य होईल असा विकास आम्ही करणार असल्याचा विश्वासही यावेळी दिला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, धारावीच्या माध्यमातून पूर्ण बकालपण मुंबईत आणण्याचा डाव सरकारचा आहे. तो देखील आम्ही हाणून पाडणार आहे. धारावीत चार-पाच लाख नागरिकांची लोकवस्ती आहे. त्यातील अर्धी अधिक लोक हे अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची दहिसर मिठागर या ठिकाणं पाठवायची योजना आहे. मात्र धारावीकरांना धारावी सोडायची नाही आणि बाकिच्यांनाही समजत नाही की नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. आताच्या निविदेप्रमाणे किंवा नियमबाह्य सवलतीप्रमाणे धारावीचा विकास करायचे ठरवलं आहे. तर मुंबईवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा भार पडणार आहे. जर कॅलक्युलेशन केलं तर हजारो एकर जमिन ही आजच अदानींना दिली आहे. त्याच्याबाबत आदेश दिलेले आहेत. सरकारचा हा डाव हाणून पाडायचा असल्याचा इशाराही यावेळी दिला.

Exit mobile version