Tag Archives: उद्धव ठाकरे

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका, घरी बोलावून मंत्री केलं ही चूक बच्चू कडू शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने केली टीका

गत महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना घरी बोलावत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. तसेच बच्चू कडू यांचा योग्य तो सन्मान राखला असे असतानाही शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री पदाची पर्वा न करता एकनाथ शिंदे यांची साथ …

Read More »

अहिल्यानगर- चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालय ५० कोटीच्या आत मात्र नागपूरात १०० कोटीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार पहिल्या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्या नगरमध्ये नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर मात्र पूर्वीचे अहमदनगर येथे इमारतीची उभारणीही केली. त्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रूपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचधर्तीवर राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने उभारायचे …

Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट जैन मुनीचे विधान जैन धर्माच्या अहिंसा तत्वाला छेद देणारे, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर तत्काळ कठोर कारवाई करा,

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधी हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, गॅस टंचाई नाही म्हणता… मग रांगा कशासाठी? गॅस पुरवठ्यावरून राज्य सरकारला केला सवाल

राज्यात एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही असा दावा सरकार करत असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या विरोधाभासावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गॅस टंचाई नाही म्हणता, तर मग लोक सिलिंडरसाठी रस्त्यावर रांगा का लावत आहेत?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला …

Read More »

उद्धव ठाकरे यांची भावना, अजित दादा सारखा उत्तम, दिलदार मित्र गमावला अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही अजित पवार गेले याचे वास्तव अद्यापही वाटत नाही. परंतु निसर्ग नियमानुसार अजित पवार यांच्या मृत्यू झाला हे कटू सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. आज पासून अर्थसंकल्पिय अधिवेशऩाला सुरूवात झाली. प्रथे प्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना उबाठाला पाठिंबा चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी  शिवसेना (उबाठा) ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ पूर्वी पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले पाहिजे. अशा सूचना स्मारकाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्मारक ट्रस्टच्या बैठकीत दिल्या. उद्धव ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ट्रस्टींची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित …

Read More »

महानगरपालिका मतदानावेळी गोंधळात गोंधळ, नावे गायब, शाई पुसली जाण्याचा प्रकार नवा विरोधकांकडून गोंधळावर भाष्य करताच, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची खिल्ली

जवळपास ७ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. मात्र राज्यातील अनेक निवडणूक केंद्रावर भल्या सकाळीच ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या त्यामुळे उशिराने मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये मुंबईतील मतदान केंद्रांपासून ते विदर्भातील काही मतदान केंद्रापर्यंत अशा घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. तसेच अनेक ठिकाणी मतदारांची नावे दरवेळीच्या …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आदेश जुनाच

महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे. जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह …

Read More »

भाजपाच्या अण्णामलाई यांचे ठाकरे बंधू यांना आव्हान, पाय छाटून दाखवा राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोण मला धमकावत आहेत

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा चांगलाच ज्वर वाढला आहे. त्यातच या निवडणूकीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे २० वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्रित आले. तसेच मनसे-शिवसेना उबाठाच्यावतीने नुकतेच प्रचाराच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क येथे जाहिर सभा झाली. नेमक्या याच कालावधीत मुंबईच्या महापौर पदावरून …

Read More »