काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमातील वृत्ताच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पुण्यातील पोर्शे कारप्रकरणी नोटीस पाठविल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी टीकाही केली होती. त्यावर अजित पवार यांनी यासंदर्भात एका जाहिरसभेत बोलताना सुनिल टिंगरे यांच्याशी मी आजच सकाळी बोललो, तसेच साहेबांना सुप्रियाला नोटीस पाठविली का म्हणून विचारलं पण असे काही केले नसल्याचं त्यानं सांगितल्याचा खुलासा केल्याची माहिती अजित पवार यांनी स्वतः दिली होती. त्यानंतर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घरातल्या लोकांकडूनच असे आरोप करण्यात येत असल्याचे टीकात्मक वक्तव्य केले.
परंतु आज सुप्रिया सुळे यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनिल टिंगरे यांनी नोटीस पाठविल्याचे सांगत त्यासंदर्भातील पुरावा म्हणून नोटीशीची प्रतच आज पत्रकार परिषदेत दाखविली.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यांच्या आमदारांनी गुन्हेगारांना पाठिंशी घालण्याचे काम करायचे, त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आणि ती माहिती आम्ही बाहेर काढली म्हणून महायुती सरकारमधील आमदार आम्हाला नोटीस पाठवत आहे. अशा प्रकारचा दबाव महायुती सरकारकडून नव्याने आणला जात आहे. यासंदर्भात मी संजय राऊत यांच्याशीही बोलले आहे. त्यांनाही अशा पद्धतीची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आणि विरोधकांना धमकावण्याबाबतचा जाब आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच विचारला पाहिजे. निवडणूक काळात अशा पद्धतीने नोटीसा पाठवणं योग्य आहे का असा सवालही यावेळी केला.
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांनी स्थानिक महिलांना धमकाविल्याचे प्रकरणावर सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, धनंजय महाडीक हे आमच्यासोबत होते. तेव्हा ते फारच समंजस्य आणि व्यवस्थित वागत होते. तसेच त्यांच्यातील सुस्कृतपणा दिसून यायचं. पण आता तिकडे गेल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना प्रचारासाठी गेल्या म्हणून त्यांचे फोटो काढा आणि मला द्या म्हणतात आणि त्याची व्यवस्था मी बघतो असेही म्हणतात. महिलांबाबत अशा पद्धतीचे उद्घार काढणे हे योग्य नसल्याची टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, तेथील महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो काढले किंवा त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या येण्याजाण्याबाबत कोणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशारा भाजपाला देत त्या सर्वांना न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही अशी तंबीही यावेळी दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाडक्या बहिणींना १५०० रूपये दिले म्हणून तुम्ही काय त्यांच्यावर अशी जबरदस्ती करणार त्यांनी कोठे जायचे कोठे नाही हे तुम्ही ठरवणार का असा सवाल करत त्या महिलांचा लाभ बंद झाला किंवा त्यांना दिलेले पैसे परत मागण्याचा प्रकार घडला तर न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देत नाही, ते आम्ही भरलेल्या जनतेने भरलेल्या कर रूपातील पैशातून पैसे दिलेत असे सांगत महिलांनी कोठे जायचे कोठे नाही याचा अधिकार तो त्यांचा आहे. भलेही त्यांनी आम्हाला मतदान केले नाही किंवा करणार नसतील तरी आमचे सरकार आल्यानंतर त्या महिलांना ३ हजार रूपये महालक्ष्मी योजनेतून देणार असल्याचे सांगत हे पैसे राज्याच्या तिजोरीतून देत आहोत. त्यांच्याच पैसा त्यांना देत असताना महिलांबद्दल अशी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून अवमानकारक वक्तव्य करण्यात येत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.
दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपले घरातील वडीलधारी मंडळी नेहमी आपल्याला सांगतात की, चांगल्याशी संगत करा म्हणून पण धनंजय महाडिक तिकडे गेले आणि त्यांची संगतच बदलली असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
लाईव्ह | 📍मुंबई | पत्रकारांशी संवाद 🗓️10-11-2024
https://t.co/CO7pfwPhnG— Supriya Sule (@supriya_sule) November 10, 2024
