Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला भरला पाहिजे

एका लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्या मविआच्या आणि मित्रपक्षाचा आम्ही एकत्र प्रचार करत असून अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ यांनी ईडीमुळेच आम्ही सर्वजण भाजपासोबत गेल्याचा खुलासा केल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे थेट देवेंद्र फडणवीस यांना चर्चेचे आव्हान दिले.

सुप्रिया सुळे या पुण्यात बोलत होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलले आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले की यंत्रणेचा गैरवापर करत पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी अदृक्ष शक्तींकडून हे संपूर्ण देशात सुरू असल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा एक गंभीर मुद्दा आहे. यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे. ईडी आणि सीबीआयच्या जवळपास ९५ टक्के केसेस फक्त विरोधी पक्षांवर आहेत. त्याचाही उल्लेख या पुस्तकात असल्याचा दावाही यावेळी केला.

शेवटी सुप्रिया सुळे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत म्हणाले की, माझं आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विरोधी पक्ष, नेत्यांची घरे फोडाफोडीचे काम तपास यंत्रणांना हाताशी धरुन अदृश्य शक्ती सातत्याने करत आहे. अदृश्य शक्तींनी माझ्या तीन मोठ्या बहिणीं रजनी इंदुलकर, नीता पाटील, विजया पाटील यांच्या घरी पाच दिवस आयटीने छापेमारी करुन त्यांच्यावर कुटुंबावर दबाव टाकला. याचप्रकारे संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या कुटुंबाना त्रास दिला गेला ते मी पहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या चौकशी लावण्याचे काम षडयंत्रातून केले. आर. आर. पाटील यांच्या संदर्भातील अंतिम चौकशी फाईल देखील फडणवीस यांनीच लावली त्यांचीच मुख्यमंत्री म्हणून त्यावर सही आहे. अजित पवार यांना बोलवून त्यांनी सदर फाईल दाखवली. त्यामुळे फडणवीस यांचेवर खटला भरला पाहिजे त्यांनी राज्याला फसवले आहे. त्यांनी चौकशीच्या फाईल घरी कशा आणल्या व आणल्या तरी ज्यांचेवर त्यांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी मागणी केली.

Exit mobile version