मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि शिंदे यांच्या शिवसेनेसह राज्य सरकारवर टीका करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी पंचांग पाहुन नव्हे तर दुःख भोगून आत्महत्या करतोय खड्यात घाला तुमचे मुहूर्त अशा शब्दात 5 ऑक्टोंबरपासून पंचनामे सुरु करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळ सुरु करून मदत देण्यास सुरुवात केल्याचे सांगत आम्ही मुहुर्त बघतो बरे, आम्ही पंचाग बघुन सगळं करतो अशी नक्कल करत राज्य सरकारवर टीका केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शिवसेना उबाठाच्यावतीने मराठवाडा व्यापी जन आंदोलन पुकारले. मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पाएगा असे घोषवाक्य या आंदोलनाला देण्यात आले. संभाजीनगरात आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला हजेरी लावली. तसेच ममराठवाड्यातील फुटीर खासदारांना पंतप्रधान मोदी यांच्यासमोर समस्याही मांडाण्याची धमक नाही अशी टीका करत मराठवाड्याचा अनुशेष 60 हजार कोटींवर गेल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण भरणार हा अनुशेष? असा सवाल करत मत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ चिंता व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे कर्नाटक सरकारने 27 ऑगस्टला दुष्काळ जाहिर करून मदतीलाही लागले. पण आम्ही पंचागवाले, मुहुर्त बघतो बरे, आम्ही पंचाग बघुन सगळे करतो, त्यामुळे पंचागमध्ये 5 तारखेचा मुहुर्त दिलाय बरे असे सांगत नक्कल करत सरकारवर टीका केली.
मराठवाडा विकासप्रश्नी धरणे आंदोलन | प्रमुख उपस्थिती – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | छत्रपती संभाजीनगर – #LIVE https://t.co/6AvVTfMKGT
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 17, 2026
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्याच्या मरणाची वाट भघताय का असा सवाल करत शेतकरी पंचाग बघुन नव्हे दुःख भोगून आत्महत्या करतोय. खड्यात घाला तुमचे मुहुर्त. 5 तारखेपासून पंचनामे सुरु होणार तोपर्यंत कित्येक शेतकरी आत्महत्या करतील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असा माझा जाहिर आरोप आहे. या सरकारची सीबीआय चौकशी करा अशी मागणीही यावेळी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेत पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. सरकारला थोडी जरी संवेदना असेल त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहिर करायला पाहिजे. शेतकऱ्यांना बसे बैल देण्याऐवजी दुभती गाय तरी द्या असे आवाहन करत 5 ऑक्टोंबरपासून शिवसेनेचे नेते संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पंचनामे व्यवस्थित होतायत की नाही हे पाहणार असल्याचेही सांगितले.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लेकरं म्हणून एकत्र येऊया असे आवाहन करत मराठा, ओबीसी, आदिवासी सर्वांनी एकत्र यावे आणि सरकारचा डाव हाणून पाडावा असे आवाहनही यावेळी केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप समोर आले नाही. एक दिवसही ते मंत्री म्हणून संसदेत जावू शकले नाहीत असेही यावेळी सांगितले.
