Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांचे आव्हान, मराठी बाबत बोलणारा तो जर चिल्लर नसेल तर…

मुंबईत मराठी भाषा शिकण्याची गरज नसल्याची नसल्याचे वक्तव्य आरआरएसच्या नेते भैय्याजी जोशी कोण आहे त्याने मुंबईत येऊन केले. त्यांच्या वक्तव्यातुन मुंबईवर गुजराती भाषा थोपण्याचे भाजपाचे षडयंत्र दिसून येत आहे. तसेच ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हा चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर करत त्या दोघांवरील कारवाई केली नाही. मात्र आता आरएसएसचे भैय्याजी जोशी हे जर चिल्लर असतील तर कारवाईबाबत निर्णय घ्या आणि ते जर बंदा रूपया असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारा असे खोचक आव्हान शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्य सरकारला दिले.

आरएसएसचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांच्याच सरकारने दिल्यानंतर मुंबई येणाऱ्यांना मराठी भाषा शिकली पाहिजेच असे काही नसल्याचे वक्तव्य केले. त्यावरून शिवसेना उबाठाने आक्रमक पवित्रा घेतला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, गद्दार काही त्या चित्रपटाच्या शो ला गेले नव्हतेच. पण काल अनाजी पंत आले होते. त्यांनी जी काही घाण करून गेले ते पाहता त्याला गोमूत्र म्हणायचे की काय. पण त्यांनी ती घाण करून गेले. आता काही हिंदू-मुस्लिम नाही तर कटगें नही तो बटेगेंचा नारा दिला जातोय. म्हणजे काय तर धर्मातील जाती जातीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढवायचा नवा नारा दिला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी मिळवलेली मुंबई पुन्हा एकदा गुजरात्यांच्या घशात घालण्याचे यांचा षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्या अनाजी पंताने येथे येऊन जी घाण केली तेच वक्तव्य तामीळनाडू आणि दक्षिणेतील राज्यात जाऊन करून दाखवावे, मग कळेल.  मराठी भाषिक हा सोशिक आणि सहनशील आहे, त्यामुळे ते तुमच्या असल्या वक्तव्याकडे पहात नाही. आता यांनी दक्षिणेतही भाषिक वाद सुरु केला असून दाक्षिणात्य विरोधात हिंदी भाषिक असा वाद निर्माण केला आहे. असे करून संपूर्ण देशात यांना वाद निर्माण करायचा आहे. पण भाजपा आणि संघाच्या विरोधात दक्षिणेतील सर्व राजकिय पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्यांनी यांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना ज्या १११ हुताम्यांनी आपले जीवदान देऊन महाराष्ट्राची मुंबई परत मिळवली. त्या मुंबईत मराठी भाषा शिकण्याची आवश्यकता नाही म्हणणारे आरएसएसचे नेते भैय्याजी जोशी यांनी त्या हुताम्यांच्या बलिदानावर पाणी फेरत आहेत. आरएसएस ही भाजपाचा बाप आहे. त्यामुळे जे बापाच्या मनात आहे ते भाजपाच्या मनात असणार आहे. त्यांचा तो अजेंडा आहे. त्यामुळे घाटकोपरची गुजराती भाषा असल्याचे वक्तव्य करत मुंबईवर गुजराती भाषा थोपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा आणि आरएसएस कडून आधी अशीच वात पेटवून दिली जाते. त्यानंतर ती पेटली अंगावर घ्यायची रणनीती आणि अंगलट आली की मुद्दा सोडून द्यायचा अशी रणनीती असल्याचा आरोप करत वात पेटवणारे ते आणि करायला धरायला आम्ही असे सांगत राम मंदिराच्या प्रश्नही यांनी अशीच वात पेटवली आणि पळून गेले. मात्र त्यानंतर शिवसेनेने नंतरचे सगळे प्रकरण सावरले अशी खोचक टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलात म्हणून काही उपकार केले नाहीत. मराठी भाषा मुळातच अभिजात होती आणि आहे. त्यामुळे गद्दारांना स्वतःच्या मातृभाषेबद्दल जरा जरी प्रेम असेल तर त्यांनी हुतात्मा चौकात येऊन माफी मागावी असे आव्हान दिले. तसेच जसा प्रशांत कोरटकर हा चिल्लर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहिर करत कारवाई केली नाही. तसे भैय्याजी जोशी हे ही चिल्लर असल्याचे जाहिर करावे नाही तर त्या अणाजी पतांविरोधात बंदा रूपयाप्रमाणे कारवाईचा बडगा उगारावा असे आव्हान देत नाही तर मराठी माणसाला कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी अवस्था होऊ देऊन नये असे सांगत महाविकास आघाडी सरकारने मराठीबाबत केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करा असे आवाहनही यावेळी केले.

Exit mobile version