Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांनी केलेले विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’

“बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जनभावना लक्षात घेऊन बिनविरोध व्हायला हवी” हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’, असे आहे, असा सणसणीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जी जनभावना आहे त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच दुर्लक्ष करत आहेत. बारामतीत अजित पवार यांचा झालेला विमान अपघात हा अपघात होता की घातपात याचे शंका निरसन व्हावे ही महाराष्ट्राची खरी जनभावना आहे, विमान अपघात प्रश्नी एफआयआर दाखल करून ताबडतोब चौकशी करण्याचे कर्तव्य फडणवीस यांना करता आले असते पण त्यांनी ते केलेले नाही, त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत असे म्हणत, ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म’? अशी विचारणा करून अजित दादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास व्हावा ही खरी जनभावना असल्याचे सांगितले.

Exit mobile version