Marathi e-Batmya

राजन तेली आणि दीपक आबा साळूंखे पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश

काही दिवसांपूर्वी जळगांवमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजपाला मोठा हादरा बसला. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करू नये यासाठी मनधरणीही केली. मात्र आज कोकणातील भाजपाचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी आणि सांगोल्यातील काय झाडी काय डोंगार फेम शहाजी बाजू पाटील यांचे कट्टर विरोधक दीपक आबा साळुंखे यांनी आज शिवसेना उबाठा पक्षाते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजन तेली आणि दीपक आबा साळुंखे यांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.

राजन तेली यांच्या शिवसेना उबाठा पक्ष प्रवेशाने विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या राजकिय अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक दीपक आबा साळुंखे यांनीही शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केल्याने या शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांची सीट धोक्यात आली असल्याचे राजकिय जाणकारांचे मत आहे.

कोकणातील नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली हे मागील अनेक वर्षापासून सातत्याने नारायण राणे यांच्यासोबत आहेत. मात्र यंदाच्या निवडणूकीत एका पक्षाचे दोन पक्ष झाल्याने आणि यंदाची लढत ही प्रमुख अशा पाच पक्षात होत आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि बच्चू कडू यांच्या तिसरी आघाडीकडूनही उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मातोश्रीवर झालेल्या छोटेखानी समारंभात संजय राऊत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस आहे. ज्या गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी डोंगर दिसले नाहीत, आता त्या झाडांच्या मुळाखाली आपल्याला त्यांना गाडायचं असल्याचा टोलाही यावेळी लगावला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सर्वजण मातोश्रीवर आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे स्वागत दसऱ्यानंतर मी तुमच्यात पहिल्यांदाच आलो आहे. मधल्या काळात हॉस्पीटलवारी झाली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की आराम करा, पण मी सांगितलं की आता हराम्यांना गाडायचं आहे. त्याशिवाय आराम नाही. आज कामाला सुरुवात केलीय. आबांसारखा मजबूत माणूस शिवसेनेत सहभागी झाले. शिवसेनेची मशाल त्यांच्या हाती आल्याने दीपक आबा साळुंखे यांना चांगले माहिती आहे की मशाल कशी पेटवायची आणि त्याचे चटके कसे द्यायचे, आता हे चटके कधी कोणाला कसे द्यायचे ते तुम्ही ठरवायचे असेही सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ही निवडणूक सोपी नाही दीपक आबांचा विजय निश्चित आहे. गद्दार खोके घेऊन बसले आहेत. धनुष्यबाण आणि मशालवरून त्यांच्याकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. ही निशाणी तुम्हा सगळ्यांच्या घराघरात पोहोचवायची आहे. तसेच आज आपण कोणाची उमेदवारी जाहिर केलेली नाही. त्यामुळे सध्या मी इतकच सांगतोय की दिपक आबांच्या हाती मशाल दिली आहे असे सांगायलाही यावेळी उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सांगोल्याचा आमदार जरी गद्दार झालेला असला तरी सांगोलेकर जनता माझ्याबरोबर आहे दे दाखवून द्या मी प्रचाराला येईन आणि विजयी मेळाव्यातही येऊन अशी ग्वाहीही यावेळी दिली.
त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात दीपक आबा साळुंखे पाटील यांची उमेदवारी ग्राह्य मानली जात आहे.

शिवसेना उबाठा पक्षात सिल्लोडचे भाजपाचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही प्रवेश केला.

Exit mobile version