Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पेट्रोल पंप बंद, महागाई वाढली, सरकार खरं का बोलत नाही?

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत काही आश्वर्य वाटत नाही. ही फक्त सुरूवात आहे, पिक्चर अभी बाकी है कशाचेही सोंग घेता येते हो पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल पंप बंद पडत असल्याच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला अजिबातच आश्चर्य वाटत नाही. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचे वेगवेगळी विधाने आहेत. फडणवीस यांनी म्हटले की, काही काळजी करू नका आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला. भुजबळ म्हणाले की, ३० दिवसाचा साठा आहे, काटकसरीने वापरा. याचा काय अर्थ काढायचा. काय नियोजन केले? राहुल गांधी गेल्या सहा महिन्यांपासून ही गोष्टी मांडत आहेत. काय करतंय सरकार? याबाबतीत सरकार का खरे बोलत नाही,असा सवालही यावेळी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी याबाबत आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. इलेक्शन काय येतील आणि जातील. पण जो सामान्य माणूस आहे, जो टॅक्स भरत आहे, त्याने कसे जगाचे? घरी जाऊन भाज्यांचे भाव विचारा एकीकडे कांद्याला भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जो ग्राहक आहे, त्याला तो परवडत नाही, असेही म्हणाल्या.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाही आणि दडपशाही आम्ही दडपशाहीबद्दल बोलणारे लोक. कोणी राजकारणात यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा गट ठरवेल की काय करायचे आहे आणि काय नाहीए कोणी कोणत्या निवडणुकीत उतरायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. निलेश लंके हे केंद्रात कांदा प्रश्नावर लढत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे सध्या महाराष्ट्रात एक नंबर क्राईम कॅपिटल बनलेले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाही. पुण्यासह राज्यातील यंत्रणा कुलमोडली आहे यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी केली.

Exit mobile version