मी काही वर्षापूर्वी प्रहार चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट कोणाचा होता ते माहित आहे का, तो चित्रपट अभिनेता नाना पाटेकर याचा होता. त्या चित्रपटात नाना पाटेकर जेव्हा तो गुंडासमोर उभा राहतो त्यावेळी तो म्हणतो की, कम ऑन किल मी त्याप्रमाणे मी आज विरोधकांना मी म्हणतो की, कम ऑन किल मी. पण त्याचबरोबर मी एक अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आहे ना त्यात अमिताभ बच्चन गुंडाची धुलाई करण्यासाठी जाताना रूणवाहा घेऊन जात असतो आणि नंतर त्या गुंडाना रूग्णवाहिकेतून पाठवून देत असतो. त्याप्रमाणे मी ही विरोधकांना माझे आवाहन आहे की, कम ऑन किल मी, पण येताना रूग्णवाहिका घेऊन या कारण तुम्ही आल्यानंतर पुन्हा परत जाताना सरळ जाणार नाहीत असा सूचक इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या विरोधकांना दिला.
शिवसेना उबाठा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधकांना दिला. वर्धापन दिनाचा कार्यक्रम माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई ही त्यांच्या मालकांना त्यांनी देऊन टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या मालकासाठी ते मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची त्यांची इच्छा आहे. ते आहेत त्यांच्या मालकाचे नोकर. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ही शिवसेना संपणार नाही. ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त आटवून स्थापन केली आणि ती वाढवलीही. त्यामुळे ही शिवसेना ही कधीही संपणार नाही. शिवसेना संपविण्यासाठी ते दररोज प्रत्येकासोबत हॉटेलात बसून बैठका घेत आहेत, पण अशा बैठका घेऊन शिवसेना उबाठा काही संपणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पक्षाला राजकारणात मुलंच होत नाहीत. तर दुसऱ्याला आमच्यातून फुटून वेगळा गट स्थापन केला म्हणून ते काही निष्ठावंत शिवसेनेसारखे वाघ नाही. त्यांचा वाघ सध्या गवत खातोय, कधी गुजरातच्या शेतात, तर कधी आणखी कुणाच्या शेतात गवत खात बसला असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे आणि शिवसेना उबाठामध्ये होणाऱ्या युतीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट भूमिका बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मनसेसोबत युती होणार की नाही, यावरून सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. पण जे राज्याच्या मनात आणि सैनिकांच्या मनात आहे तेच होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
५९वा वर्धापन दिन | प्रमुख मार्गदर्शक – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई – #LIVE https://t.co/YRkwUH46nj
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 19, 2025
भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या आगामी निवडणूकांच्या तोंडवर भाजपाकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जेणेकरून शिवसेनेसोबत असलेला हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांसोबत संबध बिघडावेत आणि हिंदी भाषिकांची मते त्यांना मिळावीत असे त्यांचे षडयंत्र आहे. भाजपाची राजकारण खेळण्याची तीच पद्धत आहे. एखाद्याला राजकारणात त्यांच्यावर वारंवार आरोप करून इतके बदनाम करायचे की, तो तुरुंगात सुटला की त्यांच्या पक्षात प्रवेश करायला लावायचा आणि त्यानंतर तो त्यांच्या पक्षात गेला की तो कसा स्वच्छ आहे हे दाखवून द्यायचे हेच भाजपा करत असल्याची टीकाही यावेळी केली.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सध्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे, सध्या नरेंद्र मोदी आहेत, पण ते भाजपाचे पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत असे सांगत, देशाला गृहमंत्र्याचीही गरज आहे. भाजपाच्या गृहमंत्र्याची देशाला गरज नाही. कारण हे दोघेही जे करतात ते भाजपाच्या प्रचार आणि मतदारांसाठी करत आहेत. त्यामुळे भाजपासाठी असलेले आपल्याला नको आहेत असे सांगत पुढे बोलताना म्हणाले की, देशातील प्रत्येक घटनेपासून त्यांची लगेच भाजपाच्या प्रचाराच्या घोषणा देत तशा घोषणा राबवित असल्याची टीकाही यावेळी केला.
