मागील काही दिवसांपासून छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल मोठी चर्चा आरएसएसवाल्यांकडून येत आहे. मात्र ज्यांना अन्नाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला हे बघायला जायचं असेल तर खुशाल जावं असे सांगत आरएसएस आणि भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, शिंदेच्या शिवसेनेचं नाव खरं तर अमित शाह हे ठेवायला पाहिजे होतं अशी चपराकही लगावली.
ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आरएसएस आणि शिंदे यांच्या शिवसेनेवरही टीका केली.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, आम्ही मोहन भागवत यांचे फॉलोअर आहोत. मोहन भागवत जसे कुंभमेळ्याला गेले नाहीत तसे आम्ही तरी कसे जाणार असा खोचक सवाल करत छावा चित्रपट आला. त्यामध्ये भाजपाच्या लोकांच कर्तृत्व काय असा सवाल करत ते तरीही त्याबद्दल बोलत आहेत. भाजपावाल्यांना सांगण आहे की, अनाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला हे पाह्यला जायचं असेल तर जरूर बघायला जा असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यामध्ये काडीचाही संबध नाही अशा लोकांच्या हातात देशाची सुत्रे आहेत. पाकिस्तान विरोधात युद्ध सुरु झाले तर हे गच्चीवरून हिंदूत्व शिकवायला लागतील असा टोला लगावत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दैवतांवरून भांडण लावणारे, आता भाषेच्या मुद्यावरून वाद निर्माण करत आहेत असा गंभीर आरोप भाजपावर करत आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काहीही करून जिंकायचीच असा निर्धारही या मेळाव्यात केला.
आरएसएसचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून आरएसएसवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरात बद्दल आम्हाला द्वेष नाही, पण हे लोक आता भाषिक प्रांतवाद सुरु करत आहेत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, तर महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत हे सांगण माझं नाही तर हिंदूहृदयसम्राट यांनी सांगितलं होतं. आता हे जोशी घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणतात, आम्हाला शिकवू नका संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही यांनीच फुट पाडण्याच काम केल्याचा आरोपही यावेळी केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले , काही दिवसांपूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील काही कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी प्रतिक्रिया दिली. पण तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही असे प्रत्युत्तरही यावेळी दिले.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात मी काम बंद पडू दिलं नव्हत, कोस्टल रोडचं काम बंद पडू दिलं नव्हत, रूग्णालयात ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या तेवढ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. फक्त तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी कधी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही म्हणालात ना तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
मुंबई – #LIVE | पदाधिकारी व शिवसैनिकांचे निर्धार शिबीर | UddhavSaheb Thackeray | कालिदास नाट्यगृह, मुलुंड पश्चिम https://t.co/jEAASfYbv0
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 9, 2025
