Marathi e-Batmya

दादरच्या हनुमान मंदिराला नोटीस उद्धव ठाकरे यांचा सवाल, हे कुठलं हिदूत्व?

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी करत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हनुमान मंदिराला ८० वर्षे झाली असून तरीही हे ८० वर्षे जुनं असलेलं मंदिर पाडायला निघाल्यावरून उद्धव ठाकरे यांनी कामगारांनी बांधलेलं ८० वर्षे जुनं मंदिर हे आता पाडायला निघाले आहेत. त्यासंदर्भात रेल्वेने काढलेली नोटीस माझ्याकडे असून हे याचं कुठलं हिंदूत्व असा सवाल यावेळी करत आम्हाला प्रश्न विचारला जातो की, तुम्ही हिंदूत्व सोडलं का मग तुम्ही हे काय सोडले असा सवालही यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचं मंदिर पाडलं जाण्याची नोटीस येते आहे. दादरमधील मंदिरावर कुणाचा तरी डोळा असल्याचा उपरोधिक टोलाही यावेळी लगावत उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, हल्ली कुणाला सगळं मिळतं तुम्हाला माहितच आहे. बांग्लादेशात मंदिर जाळलं जात, हिंदूवर बांग्लादेशात अत्याचार केले जात आहेत. तरीही जे हिंदूत्व हिंदूत्व करतात त्या भाजपाची हिंदूत्वाची व्याख्या आणि आकार ऊकार तरी काय असा सवाल यावेळी केला.

रेल्वे विभागाने पाठविलेली हीच ती नोटीस

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे मला उत्तर मला मिळालं पाहिजे, निवडणूकीपुरतं भाजपाकडे हिंदूत्व उरलं आहे का? हिंदू म्हणजे फक्त मतं नाहीत. त्यांना भावना आहेत. आधी हिंदूना घाबरावयचं आणि मग त्यांची मंदिरही सेफ नाहीत असं जर असेल तर काय बोलायचं असा खोचक सवालही यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आता कुठे गेलं याचं हिंदूत्व, बांग्लादेशातील मंदिर सेफ नाहीत आणि मुंबईतही सेफ नाहीत. एक है तो सेफ हे ते म्हणत आहेत पण मंदिरही सेफ नाही. महाराष्ट्र बेकारीत एक नंबरवर आहे. त्यात हिंदू आहेत का? हे माहित नाही. देवेंद्र फडणवीस म्हणून यांना विचारणार आहे की, मुंबईतलं हे ८० वर्षे जुनं मंदिर असून तेथील हमालांनी हे बांधलं आहे. तिथंली झाडं वैगेरे व्यवस्थित ठेवले. असं मंदिर पाडण्याचा फतवा रेल्वे कडून जारी केला जातो, तेव्हा कुठं जातं तुमचं हिंदूत्व तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करतायत भाजपाचं हिंदूत्व काय करतं रामाचं मंदिर उभं करता आणि रामभक्त हनुमानाचं मंदिर कसं तोडता अशी प्रश्नांची सरबती ही यावेळी केली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही काय इशारे देत रहायचं ईव्हीएमच्या जोरावर त्यांनी निवडणूक जिंकली आहे. तुमचं हिंदूत्व हे फक्त मतांकरीता बाकी आहे का ग कशाला बटेंगे कटेंगे करता कशाला हिंदूना घाबरवता असा सवालही भाजपाला यावेळी केला.

Exit mobile version