साधारणतः आठ ते नऊ वर्षानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदान घेतले. त्यानंतर आज या सर्व निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. मागील १० ते १५ वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाला अखेर यश आले असून अखेर मुंबईत ठाकरे कुंटुंबाच्या एकहाती सत्तेला भाजपाने धक्का देत मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या जवळ भाजपा पोहचले. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांची आणि नंतर अजित पवार यांची एकहाती सत्ता होती. मात्र पालिका निवडणूकीच्या या रणधुमाळीत पवार काका-पुतण्यांच्या या राजकीय सत्तेलाही भाजपाने चांगलाच धक्का देत पुण्याची सत्ता राखण्यात भाजपाला यश आले आहे. तर पिंपरी-चिंचवड येथेही भाजपाने सत्ता ताब्यात घेतल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाला फारशे उमेदवार निवडूण आले नाहीत. त्यामुळे दोन्ही पवारांच्या पक्ष आता चांगलेच डब्यात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मुंबईत भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्या महायुतीला १२२ जागी आघाडीवर असल्याचे तर ठाकरे बंधूच्या शिवसेना उबाठा आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला ७० जागी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला १५ हून अधिक ठिकाणी उमेदवार विजयी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्यावतीने मुंबईत ९४ ठिकाणी उमेदवार उभे होते. मात्र त्यातील तीन ते चार उमेदवार निवडूण आले आहेत. त्यामुळे मुंबईत अजित पवार यांच्या पक्षाला खाते उघडता आले आहे.
विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणूकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३० ठिकाणी विजय मिळवता आला आहे. भाजपाला जवळपास ९७ ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाला ६० हून अधिक ठिकाणी आघाडीवर आणि उमेदवार विजयी झाल्याचे झाल्याचे दिसून येत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला मात्र ९ ठिकाणी विजय मिळवता आला आहे.
आतापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरात शरद पवार आणि अजित पवार यांची अनभिषिक्त सत्ता होती. मात्र यंदाच्या पालिका निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला भाजपाने धक्का देत पिंपरी चिंचवड मधील सत्ता काबीज केली. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाच्या जागांमध्ये घट होत त्या जागा भाजपाकडे गेल्याचे दिसून येत आहे.
