उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे.
राज्यात पहिली पासून हिंदीची सक्तीचा घाट घातला जात असताना मराठी भाषेबाबत प्रेम असणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे येत्या पाच तारखेला मोर्चाने एकत्र येत आहेत, असे असताना भाजपाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला, हा मुद्दा जनतेसमोर मांडण्यासाठी कंबर कसली आहे. मराठी भाषा, आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाने मोहिम आखली आहे.
शिवसेना (ठाकरे) आणि मनसेची हिंदी सक्ती विरोधातील भूमिका महायुतीला आगामी निवडणुकांसाठी डोईजड ठरेल, हिंदी सक्ती करुन राज्यात मराठीची गळपेची तर करीत नाही ना? असे आता सामान्य मराठी जनतेला वाटत आहे. त्यामुळे आपण सरकारने मराठीसाठी काय केले, हे सांगण्यासाठी भाजप आता सामान्य नागरिकांपर्यंत जावून आपली भूमिका पटवून देणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या असतानाच, ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांमध्ये धडकी भरली असताना आता राष्टवादी शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेसनेही या मोर्चात सहभागी होणार असल्याने महायुतीची धाकदुख वाढली आहे.
