नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या इंडिया आघाडीवर टीका करताना घरातून नळ तोडून नेतील, मंगळसुत्र काढून घेतील, घरातील म्हैस ओढून नेतील या सारख्या अनेक गोष्टी बोलल्या. तसेच यापूर्वी अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या बँख खात्यात १५ लाख रूपये देणार यासह अनेक मोठमोठ्या घोषणा करत भाजपाने आणि मोदी यांनी कोणते नॅरेटीव्हच्या आधारे निवडणूका जिंकल्या असा पलटवार करत त्यांनी हे सगळे नॅरेटीव्ह तयार केलेले नव्हते का असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.
नरिमन पॉंईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षाची एक प्राथमिक बैठक झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील जनतेने लोकशाही आणि राज्यघटना वाचविली. केंद्रातील भाजपा सरकारला एकप्रकारे लगाम लावण्याचा काम महाराष्ट्रासह देशातील जनतेने या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने केले. ज्या युती, आघाडीच्या सरकारला मोदी हे नावं ठेवत होते. आज त्याच आघाडीच्या अर्थात एनडीएच्या सरकारचे ते नेतृत्व करत आहेत. आता त्यांना एनडीएची आठवण झाली. यापूर्वी कधी त्यांना एनडीएची आठवण झाली नाही. अमित शाह यापूर्वी म्हणाले होते की एनडीएची दारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना काय बोलले होते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल काय बोलले होते, आता या दोघांसाठी दारे बंद मग आता कशी उघडली गेली असा सवालही यावेळी केला.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रात आता भाजपाचे नव्हे तर एनडीएचे सरकार स्थानापन्न झाले आहे. मात्र हे सरकार किती दिवस टीकेल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्राबाबू नायडू हे मंत्रालय मांगत आहेत, नितीशकुमार हे मंत्रालय मांगत आहेत या विषयीच्या बातम्या सतत सांगितल्या जात होत्या. हेच जर केंद्रात काँग्रेसचं सरकार आले असतं तर प्रत्येक जण आपापल्या आवडीचं मंत्रालय मांगितलं असतं आणि ते ही फारसं गाजावाजा न करता दिलंही असतं असेही साांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आगामी विधानसभा निवडूणकाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यासंदर्भातील एक बैठक आज आमची झाली आहे. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अन्य काही छोटे मोठे पक्ष आमच्या आघाडीत सहभागी होत असल्याचेही यावेळी सांगत, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही आम्ही आघाडी म्हणूनच सामोरे जात आहोत. कोकणातील काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिला असून इतर मुंबई आणि नाशिकमधील जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला असल्याचेही यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म बद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी यांना यापूर्वीच कळायला पाहिजे होतं की, त्यांना देशाने पंतप्रधान दिलंय. पण आता ते तिसऱ्यांदा त्याचं पंतप्रधान पद वाचलंय पण पुढे वाचेल हे सांगता येत नाही. तसेच उत्तर मध्य मध्ये आमच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मात्र मतदान यंत्रात घोळ घालून ते तेथील निवडणूका जिंकल्या आहेत. त्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलोय. तशाच पध्दतीने ते अन्य काही ठिकाणी प्रकार झाल्याची माहिती पुढे येत आहेत. त्या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत, असेही यावेळी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाने यापूर्वी घोषणा दिली होती की आम्हाला काँग्रेसमुक्त आणि विरोधकमुक्त भारत निर्माण करायचा आहे. मात्र मी नाशिक येथील काळाराम मंदिरात गेलो होतो, त्यावेळी म्हणालो होतो की, आम्हाला भाजपा मुक्त राम करायचा आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि अयोध्येत भाजपाने आमच्या समाजवादी पक्षाकडून सपाटून मार खाल्ला, भाजपाच्या उमेदवारांचा मोठ्या संख्येने पराभव झाल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले.
तर यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका मांडताना म्हणाले की, यापुढीलही सर्व निवडणूका आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार आहोत. तसेच आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आमच्या तिन्ही पक्षांची एक बैठक तत्पूर्वी झाली. मात्र आज झालेली बैठक फारच प्राथमिक अवस्थेत होती असे सांगत आणखी अन्य काही पक्ष आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचेही यावेळी सांगितले.
Shivsena #LIVE | UddhavSaheb Thackeray | पत्रकार परिषद | यशवंतराव चव्हाण सेंटर हॉल, नरीमन पॉइंट, मुंबई ➡️ https://t.co/v5PMSJUQ2l
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 15, 2024
