Marathi e-Batmya

महानगरपालिका मतदानावेळी गोंधळात गोंधळ, नावे गायब, शाई पुसली जाण्याचा प्रकार नवा

जवळपास ७ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. मात्र राज्यातील अनेक निवडणूक केंद्रावर भल्या सकाळीच ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या त्यामुळे उशिराने मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये मुंबईतील मतदान केंद्रांपासून ते विदर्भातील काही मतदान केंद्रापर्यंत अशा घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. तसेच अनेक ठिकाणी मतदारांची नावे दरवेळीच्या निवडणूकीप्रमाणे नावे गहाळ झाल्याने मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले. तर काही ठिकाणी पुणे, मुंबई, विरार आदी ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार उघडकीस आले. मात्र यंदाच्या निवडणूकीत निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आणि शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. परंतु राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती दिसून आली.

दुपारच्या सुमारास मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मतदान केंद्रावर मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेल्या शाई सॅनिटायझर आणि नेलपॉलिश रिमोव्हरने पुसली जात असल्याचा आरोप केला. तसेच त्यासंदर्भातील प्रात्यक्षिकतेचे व्हिडिओही जारी करण्यात आले. तर काही ठिकाणी शाई ऐवजी मतदारांच्या बोटाला मार्कर पेनने शाईची निशाणी काढण्याचा प्रकार मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचा दावाही राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आणि मतदारांकडून करण्यात येत होता.

छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार उघडकीस आले. तर काही ठिकाणी बोगस मतदान करण्यासाठी बोगस आधार कार्ड आधी कागदपत्रांचा साठा आणि काही संशयित लोकाना शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली करून दिले. मात्र आज दिवसभरात बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याच्या मुद्यावरून विरोधक शिवसेना उबाठा आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तर मतदानाच्या वेळीही सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या घटना पुढे आल्या. तर एके ठिकाणी शिंदेच्या शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले.

मात्र या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नेते आशिष शेलार यांनी विरोधकांवरच पलटवार करत पराभव होणार असल्यानेच विरोधकांकडून शाई पुसली जात असल्याचा मुद्दा जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा प्रत्यारोप करण्यात आला. तसेच पराभव दिसत येत असल्यानेच त्यासाठीच्या कारणे पुढे करण्यात येत असल्याचा आरोपही विरोधकांवर केला.

दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक हे मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत मिळेना. अखेर तासभरानंतर गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीत सापडले. त्यानंतर गणेश नाईक यांनी मतदान केले.

Exit mobile version