काही वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्याच्या अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपती अदानी धार्जिना तीन कायदे आणण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारचा कडाडून विरोध करत सरकारचा तो प्रयत्न हाणून पाडला. त्या दरम्यानच्या काळात जवळपास २०० शेतकरी शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गायिका रिहाना हिने भारतातील शेतकऱ्यांच्या …
Read More »राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. नांदेड जिल्ह्यातील छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, दिपनगरने द्वितीय, तर परभणी जिल्ह्यातील स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्राने तृतीय क्रमांक मिळविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाने, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करावा अखंड डिजिटल सेवा वितरणासाठी संबंधित विभाग आणि महाआयटीत समन्वय आवश्यक
राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’वरील सेवांचे 26 जानेवारी रोजी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा
पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या …
Read More »महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर
महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच …
Read More »संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या एअर इंडियाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात या सर्व हुतात्म्यांची नावे ठळकपणे आणि सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आवश्यक ती कार्यवाही …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले
राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे …
Read More »आशिष शेलार यांचे निर्देश, मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारणीसाठी आराखडा तयार करा मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग
देशातील ऐतिहासिक तंतुवाद्य निर्मिती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी मिरज येथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग आणि संबंधित …
Read More »आशिष शेलार यांचे निर्देश, मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करा राज्यात पाच ठिकाणी स्क्रॅपिंग केंद्र
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई शहर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण
मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काळा घोडा …
Read More »
Marathi e-Batmya