काल २ एप्रिल होती म्हणजे आज ३ एप्रिल असणार हे स्पष्टच आहे. काही गोष्टींवरून लक्ष्य हटविण्यासाठी काल संसदेत वक्फ बिल संसदेत सादर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला शुक्ल कमी करण्यासंदर्भात इशारा दिला होता. तसेच जर शुल्क कमी केले नाही तर आम्ही टॅरिफ लावू असा इशारा देत २ एप्रिल पासून टॅरिफ लावणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आजपासून अर्थात २ एप्रिलपासून अमेरिकेकडून टॅरिफ लागू करण्यात आलं आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठीच वक्फ विधेयक संसदेत आणण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, टॅरिफची घोषणा झाल्यानंतर आपला शेअर बाजार कोसळत आहे, तसेच आर्थिक आघाडीवर आपल्याला त्याचा फटका आणखी कसा बसेल याचा अंदाज कोणालाच सध्या येत नाही. इतकी मोठी घडामोड घडत असताना त्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी काल दिवसभरात वक्फ विधेयक संसदेत मांडण्यात आलं. तसेच त्यावर दिवसभर चर्चा करण्यात आली. मध्यरात्री उशीरानंतर ते मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जागतिक स्तरावर इतकी मोठी घडामोड सुरु आहे. आणि आपल्याकडे वक्फ बोर्डाच्या मुस्लिम समुदायाच्या जमिनी कोणाच्या मालकीच्या यावरिल विधेयकावर आपल्याकडे चर्चा सुरु होती. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना आपल्याकडे चीनने घुसखोरी केली होती. त्यावेळी देशाचे पंतप्रधान आणि सगळेच घरी बसून काम करत होते. मात्र पंतप्रधान चीनच्या भारतातील घुसखोरीवर काहीच बोलत नव्हते. कारण आपण फक्त पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, बाकी चीन आणि इतरांना आपण तो देऊ शकत नाही, पण ते जे काही करतील ते फक्त आपण भोगू शकतो असे सांगत भाजपाकडून सध्या काय सुरु आहे हेच कळायला मार्ग नाही अशी टीका करत आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कधी म्हणायचे औरंगजेबाची कबर आहे म्हणायचं आणि लोक ती कबर उघडून टाकायला गेले तेव्हा आऱएसएसने सांगायचं की, औरंगजेब अनावश्यक आहे. तीच तऱ्हा मस्जिदच्या खाली मंदिर आहे म्हणून लोकांना सांगायच आणि लोक आपले कुदळ फावडे, घेऊन खोजायला गेले की सांगायचा अरे थांबा थांबा ही मोदीची सौगात द्यायची आहे, ती घेऊ जा म्हणून सांगायचं आणि ती पाकिटं लोकांच्या हातात द्यायची असे सांगत लोकांना माघारी पाठवायचं त्यामुळे त्यांना नेमकं काय करायचं हेच भाजपाला कळेनासं झालं आहे अशी टीकाही यावेळी केली.
मुंबई #LIVE | पत्रकार परिषद | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | मातोश्री https://t.co/y8UmmiauUj
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 3, 2025
भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काय योगायोग आहे म्हणायंच की काय काही कळायला मार्ग नाही. कधी काळी किरण रिजिजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केले होते. काल त्यांनीच वक्फ बोर्डाचे विधेयक संसदेत सादर केले. आणि त्याच्या तरतूदीही दुरुस्त केल्या. हा निव्वळ योगायोग म्हणायचा की आणखी काय म्हणायचं असा खोचक सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ईद निमित्त इफ्तार पार्ट्या झोडून सगळ्यांची पोटं भरली असती, ती आता पचवायचं काम सध्या सत्ताधारी भाजपाकडून सुरु आहे. वक्फ बोर्ड हे मुस्लिम समाजाचं आहे. त्यांच्या जमिनी कोणत्या, त्यांच्या समुदायातील लोकांच काय म्हणणं काय आहे हे त्यांचं त्यांनाच माहित त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांचाच. राज्यात वक्फ बोर्डा प्रमाणे हिंदू धर्मियांची अनेक मंदिरं आहेत, त्यांच्या संस्था आहेत. त्यावर हिंदूचेच सदस्य आहेत. मात्र त्यात जर कोणी बिगर हिंदू व्यक्तीची नियुक्ती केली तर हिंदू म्हणवून घेणाऱ्यांना किती राग येईल, असा प्रश्नार्थक जाब विचारत मग वक्फ बोर्डाच्या संचालक मंडळावर बिगर मुस्लिम व्यक्तीची निवड कशी होऊ शकते असा सवालही यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही मध्येच उठून वक्फ विधेयक मांडताना म्हणताय की हे मुस्लिमांच्या हिताचं बील आहे म्हणून आण त्यासाठीच वक्फ विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे, त्यामुळे मग आमचा सवाल आहे की, हिंदूत्व कोणी सोडलंय तुम्ही सोडलं की आम्ही सोडलंय असा खोचक सवालही यावेळी केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, कधी काळी तेलगू देसमचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शामशाबाद येथील ११०० एकर वक्फ बोर्डाची जमिन विमानतळाला दिली. मुस्लिम समाजासाठी वक्फ बोर्डाला ११०० एकर जमिन दिली होती. मग विधेयक नसतानाही तुम्ही तुम्हाला जे काही करायचे होते ते करतच होते ना, मग आताच कशाला हे विधेयक आणायचे गरज होती अशा सवालही यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे इतके दिवस मुस्लिमांच्या विरोधात बोलत होते, तेच मुस्लिमांसाठी कसे चांगले असा सवाल करत जे काही बाडगे गद्दार होते ते संसदेत मुस्लिमांसाठी हे विधेयक कसे चांगले हे सांगत होते, तुमच्या आजू बाजूला जी काही मुस्लिम समाजाच्या भलामण चालू होती, आणि गाण्यातील गद्दार सतत आमच्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप करत आहेत, मग काल मुस्लिमांची इतकी भलाभण करताना त्यांनी काय लाज सोडली होती का, कधी कुठे काढून ठेवली होती की त्यांच्या शेपट्या कुठे गेले होत्या, का मुस्लिमांचे हे लांगूलचांगूल करतय म्हणून का बाहेर पडले नाहीत असा सवाल करत मग हिंदूत्व आम्ही सोडलं की तुम्ही सोडलं असा सवालही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना थेट भाजपाला आव्हान किंवा आवाहन करतो, तुम्ही खरेच जर हिंदूत्ववादी आहे म्हणता तर तुमच्या झेंड्यावरील हिंरवा रंग काढून टाका असे आव्हानही यावेळी केले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बिहार आणि उत्तर प्रदेशातील येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे सारे काही सुरु आहे अशी टीका करत नेमकं यांना म्हणायचं काय असा सवालही करत केवळ वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप करण्यासाठीच हे विधेयक आणण्यात आलं आहे. जर त्यांना त्यांच्या मित्रांना जमिनीच द्यायच्या असतील तर त्यांनी चीन मध्ये जावं, अमेरिकेतील जमिनी द्याव्यात त्यासाठी मुस्लिमांच्या जमिनी कशाला घ्याव्यात असा सवालही यावेळी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत म्हणाले की, फडणवीस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारावर चालणार की नवाज शरिफ यांच्या विचारावर चालणार असा सवाल करत जितकं जीनांनी केले नसेल त्यापेक्षा जास्त लागूंलचांलन भाजपा आणि गद्दारांकडून करण्यात येत होतं अशी टीकाही यावेळी केली.
