अंतरिम आदेश पारित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी २ वाजता पक्षकारांची सुनावणी घेईल. वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. भारताचे तथा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश असलेले खंडपीठ दुपारी २ वाजता …
Read More »राहुल गांधी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही आरएसएसवर टीका ख्रिश्चन चर्चच्या मालकीच्या जमिनीच्या मुद्यावरून टीकास्त्र
कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे गैर-सरकारी जमीन मालक आहे, असा दावा करणाऱ्या आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या आता हटवलेल्या लेखावर ताशेरे ओढत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही टीका केली. संसदेद्वारे “मुस्लिम विरोधी” वक्फ दुरुस्ती विधेयक …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, जीनांनी केलं नसेल इतकं लांगूलचालन काल संसदेत भाजपाकडून सुरु फडणवीस अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर चालणार की नवाज शरिफ यांच्या विचारांवर चालणार
काल २ एप्रिल होती म्हणजे आज ३ एप्रिल असणार हे स्पष्टच आहे. काही गोष्टींवरून लक्ष्य हटविण्यासाठी काल संसदेत वक्फ बिल संसदेत सादर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला शुक्ल कमी करण्यासंदर्भात इशारा दिला होता. तसेच जर शुल्क कमी केले नाही तर आम्ही टॅरिफ लावू असा इशारा देत २ एप्रिल पासून …
Read More »वक्फ बोर्ड निधीः शिंदे यांच्या काळात वाद, तर फडणवीसांच्या काळात निधी देऊनही शांतता आता कोण आंदोलन करणार, भाजपाशी संबधित कोणी बोलेचना
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडून आणि विविध राज्यातील राज्यांच्या सरकारकडूनही मुस्लिम धर्मियांना उद्देशून सातत्याने टार्गेट करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातही नव्याने सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून आणि त्यापूर्वीही भाजपाचे आमदार आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे ही सातत्याने मुस्लिम धर्मिय लोकांना उद्देशून चितावणीखोर वक्तव्य करत असतात. मात्र …
Read More »आमदार रईस शेख यांचा आरोप, अल्पसंख्याक विरोधी सरकार वक्फ मंडळाच्या १० कोटी निधीचा निर्णय मागे
अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …
Read More »एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला दिलेला निधी देवेंद्र फडणवीसांकडून अखेर रद्द राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलेला निधी चुकीचा म्हणून अखेर रद्द
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने विविध समाजघटकांना खुष करण्याचा सपाटाचा लावला होता. त्यावेळी शेवटच्या दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला १० कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच वक्फ बोर्डाशी संबधित एका …
Read More »प्रकाश जावडेकर यांचे आवाहन, काँग्रेसच्या खटाखट गॅरंटीला भुलू नका काँग्रेस खोटी आश्वासने देणारा पक्ष
निवडणूक आली की खटाखट खोटी आश्वासने देण्याची काँग्रेसला सवयच आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली कोणतीच आश्वासने त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये पाळली नसल्याने महाविनाश आघाडीवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील मतदारांना केले आहे. भाजपा मीडिया सेंटर येथे …
Read More »वक्फ मंडळाला निधी देण्यावरून राज्य सरकारने केला खुलासा संयुक्त संसदीय समितीच्या सूचनेनुसारच वक्फ मंडळाला निधी देण्याचा निर्णय
देशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विविध विशिष्ट धर्मियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र यामुळे देशातील दोन समाजात सरळ दोन तट निर्माण होत आहेत याकडे केंद्रातील सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यातच …
Read More »वक्फ मंडळासाठी राज्य सरकारकडून १० कोटींच्या निधी शासन निर्णयही जारी केला
राज्यातील महायुतीच्या राज्य सरकारने वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद केली असून त्यापैकी २ कोटी रुपयांचे १० जूनला वितरीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या महायुतीच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना वर्ष …
Read More »वक्फवर नाहीतर मंडळांतर्गत पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर छापा वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये-मंत्री नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी वक्फअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर आज अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) छापा पडल्याची माहिती मिळाली आहे. तथापी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडलेले नाहीत, यासंदर्भात चुकीची माहिती प्रसारीत होत असल्याने स्पष्टीकरण करत असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »
Marathi e-Batmya