महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात झालेली एसआयआर रद्द झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच ही राज्याच्या मतदार यादीतून वगळण्यात आलेली २ कोटी मतदारांची नावे नेमकी कोणाची की अचानक वाढवलेली नावे आता काढून टाकण्यात येत आहे का असा सवाल निवडणूक आयोगाला केला.
त्यानंतर शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे म्हणाले की, हुकूमशाही कारभाराला आव्हान देणे आणि मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आरोप करणे, हा या निषेध मोर्चाचा उद्देश होता. हुकूमशहाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठीच आम्ही आज येथे जमलो आहोत. देशभरात १३ कोटी लोकांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. बंगाल आणि तामिळनाडूमध्येही मतदारांना वगळण्यात आले असल्याचे सांगतले.
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ६ ऑक्टोंबरला पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. मात्र तत्पूर्वीच निवडणूक आयोगाने २६ लाख नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली आहे. त्यासंदर्भात हा मतदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणते फक्त पोटनिवडणूक तर होत आहे. आम्ही त्या मतदारांच्या याचिकेवर सुणावनी घेऊ. परंतु आता परवा ६ तारीख आली. पण सर्वोच्च न्यायालयाही ही सुणावणी घेणार की नाही अद्याप स्पष्ट झाले नाही असा टीकाही केली. त्यामुळे उद्या ५ तारखेला जरी मतदारांच्या याचिकेवर सुणावनी घेतली तरी ते मतदार ६ तारखेला होणाऱ्या निवडणूकीत मतदारन करु शकतील का असा सवालही यावेळी केला.
तसेच सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की ही केवळ एक पोटनिवडणूक आहे, त्यामुळे काय फरक पडतो? उद्या सुनावणी होईल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मनमानी कारभारावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी ॲडॉल्फ हिटलरचा संदर्भ देत म्हणाले, इतिहास अशीच एक घटना घडून गेली आहे. जर्मनीच्या हिटलरलाही अशाच मनमानी पद्धतीने काम करण्याचा नाद होता. त्याने अनेक लाखो-हजारो नागरिकांना मारले. तसेच आपल्या देशातही होत आहे. मात्र शेवटी हिलटरवर स्वतःवर गोळी मारून घेण्याची पाळी आली अशी आठवण सांगत देशातही अशीच परिस्थिती उद्भवू शकते. ज्यांचा कारभार मनमानी आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, असे सांगत अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाना साधला.
तसेच उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानालाही पदावर असताना किंवा पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, त्यांच्या विरोधात खटला चालविला जाऊ शकतो. पण मुख्य निवडणूक आयुक्त भाजपासाठी चोरी करतो म्हणून त्याला पदावर असताना आणि तो पदावरून उतरल्यावर सुद्धा त्याच्या विरोधात गुन्हा खटला चालवला जाऊ शकत नाही इतके मोठे कायदेशीर संरक्षण देण्यात येत आहे. यावरूनच भाजपाला सत्तेत आणण्यासाठीच मतचोरी करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करत जोपर्यंत त्याला रस्त्यावर आणून कायद्याच्या चौकटीत शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, २०१४ साली पंतप्रधान मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती. त्यावेळी मेक इन इंडियाची जी काही घोषणा केली ते ठिक आहे. परंतु मेक इंडिया हुकुमशाह होणार असाल तर तुमची हुकुमशाही गाडलीच म्हणून समजा असा इशारा देत संपूर्ण देशातून १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मतदार यांनी देशातून वगळले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का असा सवाल उपस्थित जनसमुदायाला केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जो पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. तोपर्यंत आपण देखील भाजपासोबत वाहत गेलो होतो. मग काँग्रेस ऐवढे भ्रष्ट सरकार नाही असे वातावरण निर्माण केले. पण आता इंडिया अंगेस्ट व्होट चोर असे म्हणत संपूर्ण इंडिया आता उभा राहिला आहे. १३ कोटी मतदार अचानक गाळून टाकत आहात. बंगालमध्ये आतापर्यंत अवैध ठरवलेल्या मतदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आलेली नाही. त्यातल्या काही जणांना वैध ठरवलं. पण उरलेल्या मतदारांची छाननी निकाल होऊन तो निकाल अद्याप पूर्ण व्हायला १४६ महिने लागतील. हे प्रकरण इथेच संपत नाही.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजपा हे विरूद्धार्थी शब्द आहेत. ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे. त्याला सरकार चालवणे म्हणत नाही, तर सूड उगवणं म्हणतात अशी टीका करत ज्ञानेश कुमार हे भाजपंच हत्यार आहे. मतदानाचा अधिकार हे लोक काढून घेते आहेत. या संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या असतील, प्रशासन तुम्ही ताब्यात घेतलं असेल, पण हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यावर तुम्हाला फिरणे मुश्किल होईल असा इशाराही यावेळी भाजपा दिला.
