वापरकर्त्याच्या गोपनीयतेशी तडजोड न करता कामगिरी वाढवण्याच्या उद्देशाने अॅपल त्यांच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्याचा एक नवीन मार्ग सादर करत आहे. अॅपलच्या मशीन लर्निंग रिसर्च वेबसाइटवरील ब्लॉग पोस्टमध्ये तपशीलवार आणि ब्लूमबर्गने प्रथम अहवाल दिला आहे, हा दृष्टिकोन iOS 18.5 आणि macOS 15.5 च्या बीटा आवृत्त्यांमध्ये सुरू होईल. पूर्वी, अॅपल त्यांच्या एआय …
Read More »एनव्हिडियावर अमेरिकेचे निर्बंध बाजारात मात्र घसरण नॅस्डॅक बाजारात एनव्हिडियाची शेअर खाली आला
चिपमेकर एनव्हिडियाने चीन आणि इतर देशांमध्ये त्यांच्या H20 एआय AI चिप्स निर्यात करण्यावर अमेरिकन सरकारने नवीन निर्बंध लादल्यामुळे $५.५ अब्ज शुल्क आकारल्याचा खुलासा केल्यानंतर बुधवारी अमेरिकन बाजार मोठ्या प्रमाणात घसरणीसह उघडले. या घोषणेमुळे तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील विक्रीला सुरुवात झाली, ज्यामुळे नॅस्डॅक कंपोझिट १.८% ने घसरला, तर एस अँड पी ५०० ०.९% …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे १४ वे मुख्य सरन्यायाधीश बी आर गवई विद्यमान सरन्यायाधीश संजय खन्ना यांनी केली नावाची शिफारस
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे १४ मे रोजी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस कायदा मंत्रालयाकडे केली होती. न्यायमूर्ती गवई हे सध्या सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार …
Read More »राज्यात टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होणारः यंदाच्या वर्षीपासून ५+३+३+४ शिक्षण पद्धती लागू होणार
महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० लागू करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सरकारी आदेशात (जीआर) ही माहिती देण्यात आली. एनईपी NEP पारंपारिक १०+२ मॉडेलची जागा घेत एक परिवर्तनकारी ५+३+३+४ मॉडेल सादर करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणाचा …
Read More »कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…तर अटकेपासून संरक्षण एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय़ होत नाही तोपर्यंत संरक्षण
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (१६ एप्रिल) विनोदी अभिनेता कुणाल कामराला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या उपहासात्मक व्हिडिओ आणि “गद्दर” टिप्पणीनंतर त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. कामरा यांना अटकेपासून संरक्षण देताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, काँग्रेस मोर्चावर फडणवीस सरकारकडून दडपशाही खासदाराला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर गृहमंत्र्यांनी माफी मागावी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ईडी ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि …
Read More »रावसाहेब दानवे यांची टीका, काँग्रेसचे आंदोलन बेगडी, काँग्रेसला मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र
नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. काँग्रेसला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार …
Read More »रविंद्र चव्हाण यांचा विश्वास, रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपा होणार शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात …
Read More »अजित पवार यांच्या घोषणेनंतर बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र
बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द एसटी प्रशासनाला दिले निर्देश
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ …
Read More »
Marathi e-Batmya