हवामान

कोल्हापूर जिल्ह्यातील १६ बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात ८.३६ टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड …

Read More »

मान्सून कमकुवतः पाऊस गायब होणार की, पुन्हा बरसणार? हिंदी महासागरातील बाष्पयुक्त वारे आणि मान्सून ट्रफच्या कमी दाब्याच्या पट्यावर अवलंबून

मान्सूनच्या ऐन हंगामात भारताचा मोठा भागात मान्सून बरसला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तो असामान्यपणे शांत झाला असल्याचे दिसून येत आहे. शनिवार, ११ जुलै रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाचा जवळपास ७०-८०% भाग ढगाळ नसलेला किंवा अगदी कमी ढगाळ असल्याचे दिसून आले, तसेच काही प्रदेशांमध्ये कमी किंवा अजिबात पाऊस पडला नसल्याचेही दिसून …

Read More »

गणेश नाईक यांचा इशारा, वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचे डिजिटलीकरण आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच राज्यातील जुन्या व दुर्मिळ वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रक्रियेत सर्व कायदेशीर व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन केले जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत …

Read More »

८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे

जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागाचा यामध्ये समावेश आहे. ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान …

Read More »

सरकारकडून आप्तकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन नंबर जारी आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत असणारे …

Read More »

महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात नावली गावातील वरच्या बाजूचा काही भाग आज सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला. झाडासह काही भाग रस्त्यावर वाहून मलबा रस्त्यावर आला आहे. मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, प्रशासन सर्व बाबतीत बारकाईने लक्ष ठेवून कार्यवाही करीत आहे. गावाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याबाबत वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या वृत्तामुळे राज्य आपत्ती …

Read More »

४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज घाट परिसरातही पावसाचा अंदाज

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता …

Read More »

जिल्ह्यात २ ते ४ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभागाच्या ३० जून २०२६ रोजीच्या हवामान बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा (Off-shore Trough) सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात २ ते ४ जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार …

Read More »

पंकजा मुंडे यांची माहिती, प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा चंद्रपूरमधील प्रदुषणाचा मुद्दा भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला त्यास उत्तर देताना दिली माहिती

चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट …

Read More »

१५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता …

Read More »