राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या …
Read More »महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत कृषी विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक वेळा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमामुळे ही परिस्थिती बदलणार असून, महिलांना अधिकृत ओळख, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, कृषी पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या संधी ‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’चे पणनमंत्री रावल यांच्या हस्ते दिमाखदार उदघाटन
महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे आघाडीचे राज्य बनविण्यासाठी ‘मॅग्नेट २.०’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. केळी, डाळिंब, आंबा, लिंबूवर्गीय फळे, काजू आणि हळद या सहा कृषी उत्पादनांच्या समूहांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची संधी निर्माण केली जाणार असून, खासगी क्षेत्राने या प्रक्रियेत …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासाठी एकत्र काम करावे पुण्यात आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद–२०२६
भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही. गुणवत्ता, उत्पादकता, निर्यात, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावरही भर देत शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यशदा, पुणे येथे …
Read More »दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात भरीव वाढ तूर, उडीद, मसूरच्या प्रमाणित बियाण्यांसाठी आता १०० टक्क्यांपर्यंत अनुदान, हरभरा व इतर कडधान्यांनाही मोठा लाभ
उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले, तर कडधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. शेतकऱ्यांचा बियाणे वापर वाढावा आणि कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवावी, यासाठी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्वाची भूमिका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन …
Read More »अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती
जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार निवड
कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर,ऊस,संत्रे,हळद,कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya