महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म (एसटी) टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ (Lactation Pods) उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, खरीप वाया गेला आता रब्बीवरही संकट पण मदत कुठे आहे? बळीराजा संकटात असताना महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही, मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लीम वादातच सरकारला स्वारस्य
राज्यात यावर्षी सरासरी २५ टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे, शेतातील उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असून आत्महत्या वाढतायेत. राज्य सरकारने कर्जमाफी केली, त्याचा फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला बसत आहेत पण महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही. शेतकरी संकटात असून मदतीचे …
Read More »मनोज जरांगेंच्या मोर्चावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणीही राजकिय भूमिका घेऊ नये गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे. त्यातच उपोषणाचा आज १८ वा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र अद्याप पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी दिली नाही. परंतु मुंबईत पोहोचल्यावर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मनोज जरांगे यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य यापूर्वीही आंदोलन केलेय आताही ते आंदोलन करू शकतात
मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आंदोलन केलेली आहेत. यापुढेही ते करू शकतात. त्यांनी दिलेला अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा अर्ज आल्यानंतर पोलिसच त्यावर निर्णय घेतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केली असल्याचे स्पष्ट केले. …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी, एसआयआरची दोन महिने मुदत वाढवा पोच पावती असणाऱ्यांची नावे समाविष्ट करा आणि बीएलओकडील अर्जांचा निपटारा करण्याची मागणी
निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर ) असंख्य त्रुटी असून नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये लाखों पात्र मतदारांची नावे गायब आहेत, अशी तक्रार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी दोन महिने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सेवा संकल्प अभियान नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करा; अन्यथा अमित शहांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे केवळ भ्रष्टाचाराच्या हिशोबाचा दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाची राजधानी दिल्ली असली …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच …
Read More »महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर
महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळांमध्ये आरटीईच्या अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार शाळांमधील पारदर्शकता आणि नियमावलीच्या अंमल बजावणीबाबत वारंवार तक्रारी
महाराष्ट्रातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (RTE) प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील अशा सर्व अनुदानित आणि विना अनुदानित शाळांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी मानक कार्यप्रणाली, संनियंत्रण आणि मूल्यमापन …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित…शिस्तबद्ध साजरा करूया उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा
पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya