राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या नावीन्यपूर्ण उपकरणाचा प्रभावी वापर करावा. तसेच औषध गुणवत्ता तपासणीसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (एसओपी) अवलंब करून नियमित तपासणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी राज्यव्यापी अभियान राबवावे
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य संस्थांतील सेवांचे नियमित संनियंत्रण, जनआरोग्य समित्यांचा सहभाग, रुग्णवाहिका सेवेचे बळकटीकरण तसेच वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात यावा असेही …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर
कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. कुपोषणामागील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बाल टीबीचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या २ …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य
सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे …
Read More »आरोग्य विभागाकडून ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ची स्थापना शहरी आरोग्य सेवेला येणार अधिक बळकटी
राज्यातील शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन करण्यात आले आहे. या आयुक्तालयाची प्रशासकीय रचना सक्षम करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणालीचा उपयोग दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्हावा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी व्हावा. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार, जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार
गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्तक्षय हे माता व नवजात शिशु मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. हीच समस्या दूर …
Read More »अमरावती स्त्री रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला आग, तीन बालकांचा मृत्यू आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आदेश
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवी इमारतीतील शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. सोमवारी पहाटेच्या वेळी अति दक्षता विभागातील व्हेंटीलेटरचा …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’ सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर प्रशिक्षण धोरणात आमुलाग्र बदलाने कौशल्यवृद्धीला चालना
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आल्याने कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर …
Read More »
Marathi e-Batmya